हवामान खात्याचा अंदाज दुस्काळ जनक परिस्थिती,

 हवामान खात्याचा अंदाज दुस्काळ जनक परिस्थिती

      भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला .परंतु काही भागात पावसात अभावी पेरण्या कोळंबल्या आहेत या हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात दिनांक 07 जुलै ते 09 जुलै पर्यंत 35 टक्के एवढी पावसाची नोंद झाली .

       आणि पुढील काही दिवसात कोण कोकणात पावसाचा जोर ओसरणार आहे .दिनांक 01 जुलै ते 07 जुलै पर्यंत अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई ,उपनगर ,सिंधुदुर्ग उस्मानाबाद, रत्नागिरी,लातूर, सोलापूर, जळगाव, नांदेड, बीड, छत्रपती संभाजी नगर, यवतमाळ, धुळे या पूर्ण भागात तीव्र प्रमाणात पावसाची नोंद हवामान विभागान वर्तवली आहे.

       वर्धा , नंदुरबार, पुणे या भागात बऱ्यापैकी मान्सून चा पाऊस झाला .सांगली, सातारा, हिंगोली, मुंबई शहर, अकोला, अमरावती ,नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या भागात फार मोठ्या प्रमाणात पावसाची तूट असल्याची नोंद हवामान खात्याच्या अंदाजानुसार केली गेली आहे.

                मागच्या आठवड्यात विदर्भ सोडता सर्व जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला वरिष्ठांच्या माहितीनुसार काही भागात अधिक पाऊस तर काही ठिकाणी खूपच कमी आढळून आला .असल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत पुढच्या पाच दिवसात कोकण भागात पावसाचे प्रमाणात कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

        रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य विभागाच्या अंदाजानुसार 15 जुलै पर्यंत विदर्भ वगळता राहिलेल्या सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमीच राहणार असल्याचे संकेत वर्तवण्यात आलेले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *