हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना दिलासा.

हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना दिलासा.शेतकरी मित्रांनो पेरणी ही लांबली असे वाटत असेल तरी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेबांचा शेतकऱ्यांना इशारा दिला आहे.

कारण येणाऱ्या 25 जूनला राज्यात बऱ्याच प्रमाणात पावसाची सुरुवात होणार आहे .परंतु सहाजिक आहे.मागील सात ते आठ जून पासून मान्सून आहे .तो शेतकऱ्यांना हुल्कावणी दिल्यासारखे करत आहे .

वार्षिक पेरणीच्या वेळेनुसार ह्या वर्षी पेरणी लांबली असे वाटत असल्यामुळे चिंता नसावी असे डक साहेबांनी जाहीर केले आहे.येत्या काही दिवसात राज्यात पावसाला सुरुवात होईल .विशेष म्हणजे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळ आणि त्या चक्रीवादळाचा हा गुजरात वर झालेला प्रवाह याचा असा हा बिकट प्रादुर्भाव सर्वच देशावर झालेला दिसून येत आहे.

कारण या चक्रीवादळामुळे वातावरणामधील जे बाष्पीभवन होत असते ते सर्वच प्रक्रिया ही त्याच्याकडे ओढून घेतली.त्यामुळे वातावरणामधील मान्सूनचे जे वारे वाहणार होते ते पूर्ण खंडित झाले.

असा विश्वास हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेबांनी व्यक्त केला आहे.दुसरे म्हणजे हेच चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचले असून लवकरच ही चक्रीवादळाची प्रक्रिया शांत होऊन राज्यात मान्सून प्रक्रिया होणार आहे.

सध्या तरी पूर्ण राज्यात कोठेच पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी हा हवात्यदीर होऊन बसलेला आहे.परंतु येत्या 25 जून पासून पाऊस हा हजेरी लावेल असे पंजाबराव डक साहेबांनी शेतकऱ्यांना दिलासादायक वाक्य अलिप्त केले आहे.

पावसाळ्याचे जून महिन्यातील 20 दिवस उलटले असले तरी चिंता नसावी 25 ते 28 जून पर्यंत पेरणीला सुरुवात होईल.अनेक भागात जोरदार पाऊस पडेल आणि पेरणीला पण होईल. अखेर जून महिन्यातच होईल पेरणीला सुरुवात हेच आश्वासन हवामान अभ्यासक पंजाबराव साहेबांनी पूर्ण शेतकऱ्यांसाठी सांगितलेली आहे.

पेरणीसाठी योग्य पाऊस पडेल हे लक्षात घ्यायचे व चिंता करण्यासाखे काहीच नाही असेही सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *