हळदीला मिळतोय बाजारात चांगला भाव…?

हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण….?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे राज्यासह देशामध्ये हळद खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली बाजार समिती आज हळदीच्या दरात प्रतिक्विंटल मागे 2,216 रुपये इतकी मोठी वाढ नोंदवली गेली आहे मागील आठवड्यात शुक्रवारी हिंगोली बाजार समितीत हळदीला कमाल 11680 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता मात्र या आठवड्यात सुरुवातीला चार दिवस आलेल्या लागोपाठ सुट्ट्यानंतर हिंगोली बाजार समितीत आज हळदीला कमाल 13921 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे त्यामुळे आज हळद विक्रीला आलेल्या शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

आजचे हळद बाजार भाव…!

हिंगोली बाजार समितीत आज 2200 हळदीची आवक झाली असून कमाल 13921 ते किमान 11500 दर सरासरी 12720 रुपये प्रति क्विंटन दर मिळाला आहे तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजार समितीतही आज मागील आठवड्याच्या तुलनेत प्रत्येक क्विंटल मागे किंवा 700 ते 800 रुपये दरवाढ झाली आहे वसमत येथे आज 481 क्विंटल हळदीची आवक झाली असून कमाल 15010 ते किमान 9200 तर सरासरी 12105 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे याशिवाय मुंबईतील बाजार समितीत हळदीची आवक झाली असून 21000 ते किमान 14000 तर सरासरी 17500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण…!

मकर संक्रांती पासून हिंगोली बाजार समितीत हळूहळू हळदीची आवक वाढण्यास सुरू झाली असून पुढील महिन्यात बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची अवकवाण्याची शक्यता आहे सध्या दारात झालेली ही वाढ टिकून राहणार का हे पाणी महत्त्वाचे असणार आहे दरम्यान हिंगोली बाजार समिती हळदीसाठी विशेष प्रसिद्ध आहे या बाजार समितीमध्ये जिल्हा भरासह विदर्भात हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आपली हळद विक्रीसाठी घेऊन येतात विशेष म्हणजे या बाजार समितीमध्ये हळदीला दरही चांगला मिळतो असा हळद उत्पादकांचा नेहमीचा अनुभव आहे त्यामुळे बाजार समितीमध्ये हळद विक्रीसाठी आज आलेले शेतकऱ्यांकडून दराबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *