सोयाबीन पिकावरील केसाळी अळी किड नियंत्रण…!

सोयाबीन पिकावरील केसाळी अळी किड नियंत्रण…!

अगदी कमी प्रमाणात पाऊस असताना शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केलीपिकांना पूर्णपणे पाणी मिळेल.असा कुठल्याच भागात पाऊस नसताना सुद्धा शेतकऱ्यांवर दुसरे संकट पडल्याचे चिन्ह दिसत आहे ते म्हणजे सोयाबीन या पिकावर विविध किडींचा उद्रेक बघायला मिळतो आहे.त्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. परंतु त्या अळीची पारख करणे फार गरजेचे आहे.ती लोकर अळी नसून ती केसरी आली असल्याचे लक्षात आले की ही अळी सोयाबीन या पिकावर पहिल्यांदा आलेली आहे.

ह यापूर्वी या अळ्यांचा प्रादुर्भाव हा पूर्णपणे सूर्यफूल या पिकावर आढळून आला परंतु आता सोयाबीन वर सुद्धा या अळीचा परिणाम दिसून येत आहे.याचे कारण मराठवाड्यात सोयाबीन पिकाचे वाढते प्रमाण पावसाची अनियमितता पेरणीची बदललेली वेळ यामुळे हा परिणाम होऊ शकतो.

तर ही अळी पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याच्या स्वरूपात अंडी घालते आणि त्यामध्ये पिवळसर रंगाच्या नवजात असंख्य अशा अळ्या बाहेर पडतात.त्या पानाचा पूर्ण हिरवळपणा खाऊन टाकतात त्यासाठी काळजी न करता परंतु क्वीनलफॉस 25 इसी, 30मीली,10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.व अळीचे प्रमाण हे जास्त असल्यास प्रति 10 लिटर पाण्यात 40 मिली टाकले तरी चालेल यासाठी शेतात सूर्यफुलाच्या पिकाच्या जागेवर सोयाबीन पीक घेण्याचे.

अशी माहिती डॉ:दिगंबर पटाईल सर, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठावर परभणी येथे यांनी दिली आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *