सोयाबीन दरात वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतेत…?

काय आहे सध्या बाजारात सोयाबिनला भाव..?

सोयाबीनच्या दरात सध्याच्या काळात खूप कमी हमीभाव मिळत आहे याचा परिणाम पिकावर जे शेतकरी अवलंबून आहेत त्या लाखो शेतकऱ्यांचा तोटा होत आहे आणि सोयाबीन दर कमी असल्यामुळे विकावे की साठवून ठेवावे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे कारण पुढील पिकासाठी शेतकऱ्यांना यंदाचे वर्ष चालवायचे आहे आणि सोयाबीनला जर चांगला भाव मिळाला नाही तर शेतकरी खाणार काय हा प्रश्न उभारलेला आहे

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेले आहे दर उतरन चालू असतानाच दरामध्ये कोणतीही वाढ दिसत नाही त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे मराठवाडा विभागात 48 लाख हेक्टर शेती विदर्भ भागामध्ये 55 लाख हेक्टर शेती व उर्वरित राज्यात 50 लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. सोयाबीन दराच्या उतरत्या भावामुळे या शेतकऱ्यांचे अर्थकारण फिरत नाही असे दिसून येत आहे

केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण व त्यात जागतिक पातळीवर सोयाबीनचे भरघोस उत्पादन याचा थेट परिणाम सोयाबीनच्या बाजारभावामध्ये दिसून येत आहे हमीभावापेक्षा सोयाबीनचे दर खाली गेल्याने शेतकरी व्यापारी आणि उद्योगासमोर आता प्रश्न निर्माण झालेला आहे सोयाबीनचे तेल सध्या खाली दारात आहे त्यामुळे बाजारामध्ये तेलाची आवक भरपूर असल्यामुळे तेलाला ही दर नाही त्यामुळे सध्या शेतकरी तसेच व्यापारी चिंता व्यक्त करत आहेत.

सध्या बाजारामध्ये सोयाबीनचा दर 4600 रुपये खाली गेलेला दिसत आहे. लातूर बाजार पेठेमध्ये मंगळवारी आठ ते नऊ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती बाकी बाजारपेठेत दर 4400 ते 4500 यादरम्यानच मिळालेला आहे हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमी दराने सोयाबीनची विक्री होत आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *