सोयाबीन चे भरघोस असे उत्पन्न देणारे वान …!

सोयाबीन चे भरघोस असे उत्पन्न देणारे शेतकर्‍याच्या फायद्याचे उत्तम व दर्जेदार वान…!

शेतकरी मित्रांनो आपला भारत देश हा कृषिप्रधान व प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जातो.त्यातून महाराष्ट्र हे एक    प्रगतशील शेतकऱ्याचं राज्य मानले जाते.

आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण जीवन हे शेतीवर अवलंबून असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात शेतकरी हे कापूस व सोयाबीन पिकाची निवड करतात त्यासाठी कोणत्या हंगामात कोणत्या प्रकारचे बियाणे घेऊन लावगड करायची किंवा कोणता वाण हा जास्तीत जास्त उत्पन्न देऊ शकतो.

अशा योग्य जातीची निवड करणे गरजेचे असते.त्यासाठी आपण आज सोयाबीनच्या अशा दोन जातीच्या बियाणाची माहिती बघणार आहोत. कि कोणता वाण निवडायचा आणि उत्पन्न कसे वाढवायचे सध्या बाजारांमध्ये भरपूर प्रकारच्या बियाणाच्या जाती किंवा वान आहेत.परंतु उत्पन्न म्हणजे जास्तीच्या शेंगा लागणे किंवा एका शेंगामध्ये किती किती बियाणे निघतात यामध्ये सध्या दोन जातीचे वान मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

1) MAUS 725

या जातीमध्ये एका शेंगांमध्ये चार चार बियाणे आढळून येतात तर शेतकरी मित्रांनो हा वान लागवड करत असताना कशा पद्धतीने करायची याची पण पूर्णपणे माहिती करून घ्यावी,यासाठी जमीन ही पूर्णतः काळीच व भुसभुशीत असावी लागते. MAUS 725 हा वान गेल्यावर्षी परभणी विद्यापीठाकडून मार्केटमध्ये विकसित करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची की या पिकाला पूर्ण 90 ते 95 दिवसाचा कालावधी म्हणजे तीन महिने पूर्ण लागतात थोडी हलक्या स्वरूपाची जमीन असली तरी चालते खास तर मराठवाड्यात ह्या वाहनाची निवड जास्त केली जाते आणि विदर्भात शेती हलक्या स्वरूपाची असल्यामुळे उत्पन्न थोडे कमी येऊ शकते एवढा फरक काही आढळत नाही.

2) ग्रीन गोल्ड 3344

हे पण वाण त्याच स्वरूपात जास्त शेंगाची आहे. पण हे मध्यम स्वरूपाची व भारी ची जमीन असलेल्या ठिकाणी लागवड किंवा पेरणी करू शकता ती 90 ते 95 दिवस काढनिला येईपर्यंत लागतात. पूर्ण हेक्टरी उत्पन्न हे 25 ते 30 क्विंटल पर्यंत आहे.आणि विशेष म्हणजे काढणीला विलंब झाल्यास शेंगाची गळ होत नाही,त्यासाठी ह्या वानाची निवड करणे शेतकऱ्याला उपयुक्त ठरेल. योग्य त्या वानाची निवड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *