संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी…!

 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो.संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे एकदम कड्क उन्हाळ्यात – सुद्धा म्हणजेच मार्च 2023 या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी पाऊसाचा बसलेला फटका, त्यात चक्रीवादळ,अतिवृष्टी ,पुर – परिस्थिती या मुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे शासन भरपाई करत असते .

          त्याच अनुसंघाने दि.10 एप्रिल 2023 रोजी राज्य सरकारने नुकसान भरपाई चा विचार करून एक शासन निर्णय घेतला होता.संपूर्ण राज्यात सलग चार दिवस म्हणजे 4 मार्च 2023 ते 8 मार्च 2023 पर्यंत, पुन्हा 16 मार्च ते 19 मार्च या कालवधीत अवकाळी पावसाने वाऱ्यासोबत हजेरी लावली होती.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .त्याचवेळी राज्य सरकारने अवकाळी पाऊस व आपत्ती म्हणून वर्गीकरण केले होते.

             व शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान हे 33 टक्क्यापेक्षा जास्त झाल्यास त्या क्षेत्रासाठी शेतकऱ्याला अनुदान मिळेल.अशी घोषणा केली होती.त्यामध्ये छ. संभाजीनगर ,पुणे, नाशिक,अमरावती ,या चार विभागाची नावे होती.अतिवृष्टी नुकसान भरपाई ची यादी आहे.

         त्या यादीमध्ये जर आपले नाव असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दहा हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत काही जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली व एकूण 23 जिल्ह्यांना मिळून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये वर्ग करणार आहे त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत किंवा तलाठी राजा या आपल्या जवळच्या ऑफिसला भेट देऊन नाव बघून शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *