शेतातील काँग्रेस गवतावर अतिशय छान उपाय.

शेतातील काँग्रेस गवतावर अतिशय छान उपाय……

शेतातील काँग्रेस हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. मात्र त्याला काही भागात गाजर गवत असेही म्हणतात. कधी कधी शेतकऱ्यांना काही पिकांची माहिती नसते. मात्र काँग्रेस हे गवत सर्व शेतकरी बांधवांना व त्यांच्या मुलांना देखील माहिती असते. हे गवत सर्वप्रथम भारतात कुठे आढळून आले असेल ते कोणत्या देशातून भारतात आले. असेल आणि या गवताचा नायनाट करण्यासाठी कुठला उपाय आहे. याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

कृषी संशोधक यांच्या उपलब्ध माहितीनुसार काँग्रेस हे गवत भारतात सर्वप्रथम 1956 साली महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आढळून आले. तेव्हापासून हे गवत शेतकऱ्यांना अगदी त्रासदायक ठरत गेले. हे गवत मूळचे मेक्सिको अमेरिकाचे त्रिणी दाद आणि अर्जेंटिना या देशातील आहे. पहिल्या काळात हे गवत मात्र मोजक्या माळरान जमिनीवर दिसून येत होते. मात्र देशातील सर्व भागांमध्ये सर्व पिकांमध्ये फळबागांमध्ये रस्ते जंगल अशा अनेक ठिकाणी ते पसरत गेले आहे. अमेरिकेतून या पिकाचे बियाणे धान्यमार्फत आल्याचे मानले जाते.

काँग्रेस नाव का पडले…..

हे गवत अनावश्यक येणारे आणि वेड्यासारखे वाढणारे गवत असल्याचे तसेच त्याचे अस्तित्व संपत नसल्याचे त्याला देशात काँग्रेस गवत हे नाव पडले. आहे ज्या पद्धतीने राजकीय काँग्रेस पक्ष हा आपले अस्तित्व आणि सत्ता देशात टिकवून आहे पक्षाच्या या चिकाटी गुणधर्मा सोबत साथमे साधत असल्याने त्याला काँग्रेस नाव पडले.

काँग्रेसचे गवत कुठेही का वाढू शकते…..

काँग्रेस या गवतामध्ये सेस्क्यूटरपिन लॅपटॉप नावाचे विषारी द्रव्य आढळून येते. ज्यामुळे शेतात हे गवत असल्यास त्याचा पिकांच्या ओव्हन व वाढीवर विपरीत परिणाम होतो. या स्थानामुळे जागोजागी लहान रस्ते शेतांचे बांध झाकोळून गेलेले दिसतात. या गवताच्या सानिध्यात बऱ्याचदा आल्यास माणसाला त्वचेचा आजार ताप व दमा यासारखे आजार होण्याची शक्यता असते. दुधाळ जनावरांनी काँग्रेस गवत खाल्ल्यास उत्पन्नात उत्पादनात मोठी घट येते. या गवताची विशेषता म्हणजे ते कोणत्याही वातावरणात जमिनीत वाढू शकते.

या गवतावर कसे कराल नियंत्रण….

काँग्रेस या गवताला पांढऱ्या रंगाची फुले येत असतात या गवताचा रस खूप कडू व त्रासदायक असतो या गवताचे एक झाड मात्र 5000ते 25000 बियाणे तयार करू शकतात हेवी वजनाला खूप हलके असते त्यामुळे पावसाळ्यात पाणी हवेमार्फत सहज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकते. त्यामुळे या गवताला समोर नष्ट करण्याचा व प्रभाशाली उपाय त्याला बियाणी येण्याआधी त्याला उपटून टाकले तरी ते येते त्याला राऊंडउप या विषारी तणनाशकाने देखील नष्ट करता येत नाही. ते गवत पुन्हा उमलायला लागत त्यामुळे शेतकरी हे गवत उपटून एका जागेवर गोळा करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करू शकतात. सेंद्रिय खत पूर्णपणे सुरक्षित असते. त्याला काँग्रेस गवताचा कोणताही प्रसार होत नाही. त्याचे खातात रूपांतर होताना पूर्णपणे विघटन झालेली असते. या खतापासून पिकांना पोषक घटक मिळून उत्पादन वाढीस मदत होईल. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे गवत आढळेल. त्या त्यावेळी बियाणे येण्याआधी त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करावी म्हणजेच काँग्रेस गवताचा नायनाटही होईल आणि पिकांना खत देखील मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *