शेतकऱ्याच्या बांधावर किंवा पडीत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा मोठा निर्णय.

              शेतकरी मित्रांनो शासनाने घेतला आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय.प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर किंवा पडीत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचा व त्यासाठी लागणारे खर्च यामध्ये 50 % अनुदान तर लक्षात घ्या मित्रांनो शासन व केंद्र शासन ही वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवीत असते. हि एक महत्त्वाची योजना राबविण्यात आली आहे.

                 शेतकरी बांधवांना दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर ह्या कालावधीत वन महोत्सव म्हणून ओळखला जातो या काळात शासनाच्या मार्फत शेतकर्यांना पडीक जमीन असो किंवा आपल्या शेताच्या चारही बाजूने बांधावर असो किंवा प्रत्येक शाळेमध्ये कंपाउंड वॉल म्हणून झाडे लावण्यासाठी शासन रोपाचा पुरवठा करत असते.

       त्यामध्ये इंधनासाठी वापरात येण्यासाठी चे जे आहेत. सुळबाभूळ, बाबुळ,लिंब ,निलगिरी, करंज आहेत.आणि त्या मध्ये फळं वृक्षामध्ये लागवड जर बघितलं तर चिंच,आवळा ,बोर, जांभूळ, रायफळं, आंबा, कवट, बिबा, रामफळ, सीताफळ याप्रमाणे सर्वच महत्त्वाची रोप हि शासन पुरवित असते .

               त्यामध्ये व्यापारा साठी उपयोगी म्हणजे बांबूची लागवड असेल पुन्हा शोभे साठी असलेले सुध्दा या मध्ये येत असते. यामध्ये औषधी उपयुक्त अशोका,चंदन,पिवळा बांबू, यांचा समावेश असतो,यासाठी या कलमांना शासनाकडून 50 % टक्के अनुदान दिले जाते,या अनुदानाचे दर या शासनाच्या निर्णयातून निश्चित करण्यात आले आहेत ,2017 पासून राज्यात कमीत कमी 50 कोटी वृक्ष लागवड साठीचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

त्यामध्ये खाजगी मालकीच्या क्षेत्रात किंवा रेल्वेच्या दोन्ही साईट, तलावाच्या दोन्ही साईट, रस्त्याच्या दोन्ही साईड, किंवा सामायिक क्षेत्रामध्ये पूर्ण लागवड करता येते.इसवी सन 2023 -24 याकरिता रोपाची विक्रीचे दर निश्चित केले गेले आहे यामध्ये नऊ महिन्याच्या रोपाचे दर वेगळे 18 महिन्याच्या रोपासाठी वेगळे दर ठेवले आहे.

         वृक्ष लागवड तर करायची पण करण्याची आर्थिक बाजू नाही अशा संस्थेना ,शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून रोप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यामध्ये शाळा महाविद्यालय यांना जर वृक्ष लागवड करायची असेल तर त्यांना प्रति एक रुपयाच्या प्रमाणे रूप दिले जाणार आहे.असे निर्णय दि.28/06/23 च्या शासन निर्णयात घेण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *