शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ,11 तारखेपासून होणार मोठ्या पावसाला सुरुवात.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी , या तारखेपासून होणार मोठ्या पावसाला सुरुवातज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अतिशय राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यावर्षी दुष्काळ पडणार नसून कमी कालावधीत जास्त पाऊस पडणार आहे.

अजून जवळपास दोन ते अडीच महिने पावसाचे असून या कालावधीत जोरदार पाऊस पडणार आहे. राज्यातील जवळपास बहुतांश सर्वच धरणे फुल भरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सध्या राज्यातील काही धरणे भरली आहे,तर काही धरणांतून विसर्ग सुरू आहे. याव्यतिरिक्त हवामान अभ्यासक माननीय पंजाबराव डख साहेब यांनी आगामी काही दिवस राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत देखील माहिती दिली आहे.

माननीय पंजाबराव डख साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान राज्यात काही हलक्या पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत.तर राज्यात 15 ऑगस्ट नंतर खऱ्या अर्थाने पावसाचा जोर वाढणार आहे. स्वातंत्र्य दिनानंतर मोठ्या पावसाचा अंदाज माननीय पंजाबराव डख साहेब यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे,राज्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे.या कालावधीत राज्यातील,विदर्भ, उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र त्यातच सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.म्हणजे सप्टेंबर महिन्यात देखील 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान मोठा पाऊस पडणार असा अंदाज माननीय पंजाबराव डख साहेब यांनी व्यक्त केला.

एवढेच नाही तर ऑक्टोंबर महिन्यात देखील अशीच परिस्थिती राहणार. आणि 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान राज्यात खूप मोठा पाऊस राहणार असं मत माननीय पंजाबराव साहेबांनी यावेळी व्यक्त केले आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *