शेतकऱ्यांना मिळणार सततच्या पावसामुळे नुकसान भरपाई.

शेतकऱ्यांना मिळणार सततच्या पावसामुळे नुकसान भरपाई.

शेतकरी मित्रांनो सततच्या पडणारा पाऊस हे एक प्रकारचे शेतकऱ्याच्या जीवनाचे मोठ संकटच म्हणाव लागेल.कधी वादळीवाऱ्यासह पाऊस पडेल तर कधी पिकाचे नुकसान होईल हे सांगता येत नाही .परंतु शासनाने आता ही एक नवीन आपत्ती समजून राज्य शासनामार्फत सततच्या पाऊस मुळे शेतकऱ्याची होणारी पिकांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय 5 एप्रिल 2023 च्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.

त्या वेळेस मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अध्यक्ष स्थानी होते.त्या वेळेस सुमारे 15.96 लाख हेक्टर आणि बाधित जमिनीतील 27.36 लाख शेतकऱ्यांना हि मदत म्हणून शिंदे साहेबांनी जाहीर केले होते .विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे होणारे सततच्या पावसामुळे नुकसान यालाच शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निष्कर्षानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याचे ठरवले.

    त्यामध्ये केंद्रशासनाने सुद्धा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी चे दर यामध्ये सुधारणा केली.त्यामध्ये जिरायती मध्ये हेक्टर 8500/- रुपये बागायती पिकाच्या नुकसानी साठी 17000/- रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानी साठी 22500/- रुपये हे प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाईल.

     सततच्या पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान भरून सुधारित दरानुसार शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.या आधी पण 750 कोटी रुपयांची मदत या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली होती.आणि या निर्णयाचा फायदा 14. 96 लाख हेक्टर बाधित शेत्रातील27.36 लाख शेतकऱ्यांना होणार आहे .

पहिल्या घेतलेल्या नर्णयानुसार बरेचसे शेतकरी बसत नसल्यामुळे त्यातील निकष शिथिल करून केंद्राच्या सुधारित दरानुसार राज्य शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *