शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

खता विषयी शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

रासायनिक खत ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रासायनिक खताच्या किमती व अनेक बी बियाण्याच्या किमती ह्यात बऱ्याच दिवसा पासुन वाढ झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकवणे हे न परवडणारी बाब बनली आहे. त्यासाठी खत बी बियाण्याच्या किमती कमी व्हाव्या यासाठी शेतकरी बांधवाकडून मागण्या होत होत्या.

युक्रेन आणि रशिया या दोघांच्या वादामुळे जगामध्ये ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्या काळात भरपूर असा रासायनिक खताचा तुटवडा आढळून आला असल्याने खताच्या किमतीमध्ये 60 % टक्के वाढ झालेली होती,
परंतु या किमती मध्ये आता 14% टक्क्यांनी कमी झालेली दिसून येते.
आता आणखीन पुढील काळात शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणारी खते ही स्वस्त दराने मिळतील व त्याचे दर पत्रकही सादर केले जाईल.आणखी एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे जगामध्ये भारताने सर्वप्रथम नॅनो ,डी ए पी चा शोध लावला आहे. ते पण मार्केटमध्ये सध्या उपलब्ध झालेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *