शेतकरी मित्रांनो पेरणी करताय थांबा …?

 

मित्रांनो मान्सून  लांबलाय हवामान खात्याचा अंदाज , 

 

शेतकरी मित्रांनो आज हवामान खात्याच्या अंदाजा नुसार यावर्षी मांन्सून हा अतिशय संत गतिने वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसत आहे.आणि हा मांन्सून येणाऱ्या 23 जून च्या नंतर पुर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण भाग व्यापून टाकले असा नविन प्रकारचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे. हवामान विभागाच्या अंदाजा नुसार  जून मधिल मांन्सूनची वाटचाल हि अतिशय मंद गतीने वर्तवण्यात आले होते. साधारणतः 4 जून पर्यंत मांन्सून हा केरळ मध्ये पोहचेल परंतु 7 जूनला तो केरळ ला दाखल झाला आणि 10जून ला मांन्सून महाराष्ट्राच्या सिमेवर येऊन पोहचला परंतू अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्री वादळा मुळे मांन्सून ची वाटचाल ही पूर्णतः बंद झाल्याचे दिसून आले,हेच चक्री वादळ वेळोवेळी वेगवेळ्या दिशेने सरकत गेले आणि गुजरात ला धडकल्या नंतर पुन्हा एकदा उत्तर पुर्व दिशेने त्यांची वाटचाल हि भरता मध्ये होत आहे.परंतु या सर्वच वातावरणाचा विचार केला तर 10 जुन ला पोहचलेला मांन्सून हा एका ठिकाणी आहे.आणि कुठल्याच राज्यात मांन्सूनचा पाऊस हा पाहायला मिळाला नाही. चक्रीवादळाच्या परिणामामुळे काही ठिकाणी वाऱ्यासहित हानिकारक पाऊस पडला. चक्रीवादळ हे पूर्ण शांत झाले आहे आणि आता मान्सून वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

            साधारणतः 17 ते 18 जूनला मान्सूनचा वाऱ्यासह वेग वाढल्या जाईल व हळूहळू महाराष्ट्राच्या काही भागात मांन्सूनचा पाऊस पडण्यास चालू होईल. साधारणतःहा मांन्सून 15 जून ला पूर्ण परिसर व्यापात असतो परंतु तो केरळ च्या किनारपट्टीवर अडकलेला आहे.तो आता कमित कमी 23जूनच्या नंतर पुर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी हवामान खात्या कडून माहिती दर्शविण्यात आलेली आहे.

त्यासाठी शेतकरी मित्रांनो 23 जून ते 30 जून या दरम्यान एक तरी चांगला पाऊस पडू द्या व एका प्रकारची शाश्वत एका प्रकारची ओल हि जमिनीत तयार झाल्या नंतरच पेरणी करावी हे लक्षात घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *