मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात सरासरी पेक्षा कमी पाऊस…?

     

         शेतकरी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत सरासरी 27% पावसाची नोंद झाली आहे राज्यामध्ये मान्सूनची सुरुवात झाल्यापासून अनेकदा ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट असा सतर्कतेचा इशारा हवामान अंदाज कडून वेळोवेळी देण्यात आलेला आहे परंतु सरासरी पेक्षा राज्यात कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे

         विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने वर्तवली आहे. यावर्षीच्या मोसमी पावसावर एल निनो चे सावट आहे, तिकडे महासागरात एल निनोची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे.

           परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षीही सरासरी इतकाच पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडत असला तरीही त्या पावसाची तीव्रता दरवर्षीच्या तुलनेपासून फारशी कमीच आहे .

         परंतु त्यासाठी हिंदी महासागरातील इंडियन ओशन डाय पोल नावाचा घटक वातावरणामध्ये अनुकूल असणे गरजेचे आहे परंतु तशी स्थिती आणखी निर्माण झाल्याचे दिसून येत नाही हवामान खात्याचे विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी हवामान खात्याचा आढावा घेतल्यानंतर दिनांक 07 जुलै रोजी आतापर्यंत झालेल्या पावसाची सविस्तर माहिती दिली त्या माहितीनुसार कमी पाऊस झाल्याची नोंद दिली आहे देश पातळीचा विचार केल्यास तीन टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

           राज्याच्या तुलनेत सरासरी पेक्षा 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे आतापर्यंत कमीत कमी 277.7 मिलिमीटर पावसाची नोंद होत असते 203.8 मिलिमीटर पाऊस पडला आहे, कोकण भाग आणि गोवा या राज्यात सरासरीपेक्षा तीन टक्के महाराष्ट्रात 35 टक्के, मध्य महाराष्ट्रात 31 टक्के तर विदर्भात 43% कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कश्यपी यांनी सांगितले आहे .

         याचाच परिणाम यावर्षीच्या पिकावर होईल का राहिलेल्या काळात पावसाची सरासरी भरून निघेल का दोन्ही हंगामाची पिके निघतील का अशी चिंता सध्याच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांना पडलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *