शेतकरी मित्रनो झेंडू फूल पिकाचे करा योग्य नियोजन.

झेंडू उत्पादनासाठी योग्य सल्ला…!

झेंडूच्या फुलांना सण-समारंभामध्ये चांगली मागणी असल्यामुळे फुल शेतीमध्ये झेंडूला महत्त्वाचे स्थान आहे. झेंडूची लागवड संपूर्ण वर्षभर म्हणजे सर्व हंगामात लावता येते परंतु योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी आणि सन समारंभात फुलांचे योग्य उत्पादन मिळेल याप्रमाणे लागवडीचे नियोजन करावे लावगडीपासून साधारणत: अडीच ते तीन महिने या कालावधीत फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते त्यानुसार लागवडीची वेळ ठरवावी.

फुल शेतीमध्ये झेंडू हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. तसेच भाजीपाला व फळ पिकांमध्ये सूत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडूचे मिश्र पीक घेतले जाते.राज्यात प्रामुख्याने पुणे,नाशिक,नगर,सातारा,कोल्हापूर परभणी सोलापूर, अकोला,नागपूर,नांदेड,औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात आढळून येते.

झेंडू पीक लागवडीसाठी जमीन कशी असावी..?

झेंडू पिकाची उत्तम निचरा होणारी जमीन बघावी. जमिनीचा सामू 6 ते 7.5 असावा. हलकी आणि मध्यम जमीन या पिकास पोषक आहे. भारी जमिनीत पिकाची वाढ जरी होत असेल तरी उत्पादन कमी मिळते.उष्ण आणि समशीतोष्ण हवामान असेल तर झेंडूची संपूर्ण वर्षभर लागवड करता येते.थंड हवामान असेल तर पिक अति उत्तम प्रकारे येते, फुलांचे भरघोस उत्पादन मिळते. जास्त पाऊस असेल तर परिणामी फुलांची वाढ होते.

झेंडूच्या प्रमुख आणि महत्त्वाच्या जाती..?

झेंडूच्या झाडांची उंची, वाढीची सवय आणि फुलांचा आकार यावरून झेंडूच्या जातीचे आफ्रिकन आणि फ्रेंच या दोन प्रकारात वर्गीकरण करता येते.

आफ्रिकन झेंडू : या प्रकारातील झेंडूची झाडे आहेत 100 ते 150 सें. मी. उंच वाढतात. फुले टपोरी,असतात फुलांना पिवळ्या आणि केशरी रंगांच्या पाकळ्या असतात. या प्रकारची फुले हारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. आफ्रिकन झेंडूंमध्ये कॉकर ज्यक, आफ्रिकन डबल मिक्सड, येलो सुप्रीम गियाना गोल्ड,पाई, आस्लका, पुसा बसंतीआणि गेंदा या प्रमुख जाती आहेत.

फ्रेंच झेंडू : या प्रकारातील झाडे 30 ते 40 सें. मी. उंचीची आणि झुडपा सारखी वाटतात या फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगात मात्र विविधता असते. फ्रेंच झेंडूंमध्ये स्प्रे बटर लेमन ड्रॉप्स फ्रेंच डबल मिक्सड अर्का आणि बंगारा या प्रमुख जाती आहेत.

खत आणि पाणी व्यवस्थापन

पिकांचे एकसारखे आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी झेंडूला वरखत देणे आवश्यक आहे संपूर्ण स्फुरद व पलाश अर्धे नत्र लागवडीच्या वेळी आणि अर्धे नत्र लागवडीच्या नंतर एक महिन्याने द्यावी. 60 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 25 किलो पलाश याप्रमाणे खत देऊन झाडांना भरघोस माती द्यावी. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळ्या आल्यापासून ते तोडणी संपते पर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. म्हणजेच या काळात आवश्यकतेनुसार जास्त पाणी देऊ नये.

फुलांची तोडणी व उत्पादन..?

लावगडीपासून सर्वसाधारणपणे अडीच ते तीन महिन्यात फुलांचे उत्पादन मिळायला सुरुवात होते. जून महिन्यात झालेल्या लागवड ची तोडणी ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात सुरू होते. पूर्ण उमललेली फुले देठापासून तोडावीत तोडणी दुपारनंतर करावी तोडलेली फुले सावलीत गारव्याला ठेवावीत योग्य काळजी घेतल्यास हेक्टरी सात ते दहा टनापर्यंत उत्पादन मिळते…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *