विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा राज्य शासना चा सर्वात मोठा निर्णय…!

     

         विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय,मित्रांनो राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे फार मोठा महत्त्वाचा निर्णय तो असा की महाराष्ट्र राज्यातील वर्ग ३ रा ते १० वी पर्यंतच्या राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पुस्तकाच्या पाठीमागे वह्याची पाने जोडलेली पुस्तके येणाऱ्या काळात शैक्षणिक वर्ष 2023 -24 मध्ये उपलब्ध करून देणार आहे.

           ही योजना वर्ग ३ रा ते १० वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक कविता ,पाठ ,किंवा प्रत्येक घटक, त्यांच्या शेवटी एक किंवा दोन वह्याची पाने जोडण्यात येणार आहे. या वह्याच्या पानावर मुलांकडून वर्गात शिक्षक शिकवीत असताना वर्गात अध्यापन सुरू असताना त्या पानावर महत्त्वाच्या मुद्द्याच्या नोंदी करणे जसे की, महत्त्वाची सूत्रे ,महत्त्वाची व्याकरण, शब्दार्थ ,इतर महत्त्वाची वाक्य आणि पाठ्यपुस्तकातील ही वह्याची पाने माझी नोंद या नावाने पुरवली जाईल.आणि राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा घेतलेला हा निर्णय फारच महत्त्वकांशी ठरला आहे.

             यामध्ये विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर शिक्षण आणि शिक्षणाचे लागणारे वेगवेगळे साहित्य पाठ्यपुस्तक आणि वह्या याच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले .ग्रामीण भागात असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या शरीरावर आरोग्यावर फारच विपरीत परिणाम होत आहे .विशेषतः म्हणजे खेडोपाडी शिक्षण घेत असलेल्या गरीब शेतकऱ्याच्या मुलांना मुलींना योग्य असे पूर्ण झालेले शालेय साहित्य वेळेवर उपलब्ध होत नसते .यामुळे पण हा निर्णय फारच महत्त्वाचा ठरला गेला .

या सर्वच मुद्द्यांचा विचार करून राज्य परीक्षा मंडळ, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,शिक्षण तज्ञ, बालभारती चे अधिकारी या सर्वांनी मिळून चर्चा करून चर्चेअंती हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या आदेशामुळे विद्यार्थ्यांना एकदम सोपे व अभ्यासक्रमासाठी योग्य अशी दिशा मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *