राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतला महत्वाचा निर्णय

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतला महत्वाचा निर्णय

शेतकरी मित्रांनो खर तर शेतकऱ्यांची खरी मालमत्ता ही शेती म्हणजे शेतीचा सातबारा व पी,आर कार्ड म्हणजेच ग्रामीण भागात आठ अ. उतारा यास म्हंटले जाते.ही दोन्ही कागदपत्रे महत्वाची मानली जाते. जमीन कोणाच्या नावावर आहे. कुठला बोजा त्यावर आहे हे समजले जाते.

खर तर यामध्ये वडिलोपार्जित असल्यास जमिनीचे खरेदीखत, कागदपत्रक, हक्कसोड पत्रक,दत्तक पत्र ,किंवा वरसाचे प्रमाणपत्र दाखल करून करण्यात आलेला फेरफार यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला अनेक वेळा तहसील कार्यालया मध्ये फेऱ्या माराव्या लागतात.

त्याचे परिणाम गरीब जनतेला भोगावे लागतात त्यामध्ये अनेक प्रकारचे वाद निर्माण होतात .त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता पर्यंत महसूल खात्याकडे जमीन महसूल सहिंता 167 च्या कलम 155 अन्वये तहसीलदार किंवा उपअधक्षक भूमी अभिलेख याच्याकडे अर्जाद्वारे दुरुस्त कराव्या लागत होत्या

त्यासाठी वर्षानुवर्ष चकरा माराव्या लागत असे वेळ जाऊनही सातबारा व आठ.अ मधील दुरुस्ती होत नव्हती.इतर वारसाचे नावे असलेले दुरुस्ती होत नव्हती परंतु आता शासनाने दी:1/8/23 महा इ – सेवा केंद्र द्वारे ऑनलाईन करता येईल.यामध्ये शेतकऱ्याची वेळ वाया जाणार नाही,चकरा मारण्याचे काम पडणार नाही व तहसील कार्यालयालाही ताणू घेणार नाही.यासाठी हा अति उत्तम प्रकारचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *