राज्यात होणार अतिवृष्टी…?


शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे जवळ आलेला बैलपोळा यावर्षी 14 सप्टेंबर रोजी होत असल्याने महाराष्ट्रात दरवर्षी बैलपोळा पावसाची जोडलेला असतो संपूर्ण राज्यात पाऊस पडत नसला तरी सणाच्या दिवशी पाऊस नक्कीच पडतो यावर्षीही बैल पोळा या सणात पाऊस पडेल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे मात्र अशातच प्रमुख्यात हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख साहेब यांनी पुढील पंधरावाड्याचा हवामान अंदाज वर्तवला आहे.

 

प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डॉग साहेब यांनी त्यांच्या 9 सप्टेंबर 2023 च्या नवीन हवामान अंदाजामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सामायिक केली आहे डख साहेब यांच्या हवामान अंदाजानुसार 10आणि 11 सप्टेंबर या कालावधीत भाग बदलत ठिकाणी पाऊस पडेल याचा अर्थ या कालावधीत सर्वदूर पाऊस पडणार नाही तर भाग बदलत पाऊस पडेल डख साहेब म्हणाले 14 सप्टेंबर रोजी राज्यात अर्थात बैलपोळा या सणाच्या दिवशी पावसासाठी अनुकूल हवामान असेल.

 

राज्यात 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत श्री पंजाबराव डख साहेब यांनी पावसाचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे यावर्षी बैलपोळा सणादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सर्वप्रथम पावसाची सुरुवात पूर्व विदर्भात होईल आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात पाऊस सरकेल आणि अखेरीस संपूर्ण राज्यात पाऊस बेतेल म्हणजे 16 सप्टेंबर नंतर हवामान लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.

 

परंतु शेतकरी मित्रांनो या कालावधीत राज्यात लक्षणीय पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या कालावधीत राज्यात काही भागात अतिशय मुसळधार पाऊस पडेल त्यांनी विशेष नमुद व्यक्त केले आहे. डख साहेबांच्या मते उत्तर महाराष्ट्र पुणे आणि मंजारा धरणाला पाणीपुरवठा करणाऱ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे या कालावधी दरम्यान राज्यात बहुतांश भागात अतिवृष्टी,मुसळधार पाऊस पडेल असे प्रमुख हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख साहेब यांच्याकडून वर्तवण्यात आले आहे या मुसळधार पावसामुळे मांजरा उजनी आणि जायकवाडी या महत्त्वाच्या धरणांमधील पाण्याची पातळी वाढणार असल्याचे व्यक्त केले आहे या व्यतिरिक्त त्यांनी नमूद केले की राज्यातील असंख्य लहान धरणे त्यांची कमाल साठवण क्षमता गाठतील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *