राज्यात बर्‍याच दिवसा नंतर होणार पावसाला सुरुवात …?

 

 

 

               राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंददायक आणि अतिशय महत्त्वाची बातमी. खरंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर या ऑगस्ट महिन्यात पावसाने उघड दिली आहे.राज्यात जवळपास 14 ते 15 दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला आहे भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

खरीप हंगामातील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे पण गेल्या पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसामुळे शेती पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे.

येत्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर पिके करण्याचा धोका देखील वाढत आहे. अशातच हवामान तज्ञ श्री पंजाबराव साहेब यांनी शेतकऱ्यांना चिंता करू नका येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे असे सांगितले.
16 ऑगस्ट रोजी श्री पंजाबराव डॉक्टर साहेबांनी वर्तवलेल्या आपल्या आधारित हवामान अंदाजानुसार राज्यात येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे असे सांगितले.

हा पाऊस राज्यात पूर्वेकडून दाखल होणार असून सुरुवातीला पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता वाढणार आहे यानंतर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान: पश्चिम, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात पाऊस पडणार आहे.या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी नदी नाले भरून वादळ असे मत श्री पंजाब राव डख साहेब यांनी व्यक्त केले आहे.

या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे एक महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत अहमदनगर आणि नाशिक भागात अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्याने या भागात आता पावसाचा जोर वाढेल असे त्यांनी म्हटले आहे.पंजाबराव आणि 17 ते 22 हे सहा दिवस जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे तसेच राज्यात 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान देखील जोरदार पावसाची शक्यता आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

ऑगस्ट चा पहिला पंधरवाडा कोरडा गेल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात चांगला मोठा पाऊस पडणार असा अंदाज असल्याने हा हवामान अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना यामुळे जीव दान मिळेल…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *