राज्यात चालू असलेला सतत धार पाऊस व अतिवृष्टी मुळे कपाशी सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान.

 

दिनांक 18 जुलै पासून राज्यात चालू असलेल्या सतत धार पाऊसा मुळे काही भागात अतिवृष्टी पण झाली .त्यामुळे मध्य महाराष्ट्र,कोकण भागात तसेच विदर्भातील काही जिल्ह्याचा समावेश त्यामध्ये आहे.तर या झालेल्या सतत धार पाऊसामुळे प्रत्येक शेतकरी हा चिंताग्रस्त झाला आहे.या सतत चालू असलेल्या पाऊसामुळे खरीप हंगामातील पिके ही बऱ्याच प्रमाणात संकटात आली आहे.

मराठवाडा व विदर्भातील काही भागातील सोयाबीन हे पीक पुर्णत : पिवळे पडत असल्याच्या तक्रारी एकमेकांना चर्चे अंती प्रत्येक शेतकरी करीत आहे .आंध्र प्रदेशामध्ये तयार झालेल्या कमी दबाच्या पट्टयामुळे सततचा पडत असलेला पाऊस यामुळे शेतामध्ये विशेष : काही सोयाबीन या पिकात पाणी साचल्यामुळे व त्या पिकाची वयोमर्यादा ही पूर्ण रोपवस्थेत असल्यामुळे पूर्ण पाण्यामुळे ती पिके पडले आहे.

तर यावेळी कोणता करावा उपाय…?

           अशा परिस्थितीत अशा पिकांना उलगडण्यासाठी कोणत्या उपयोजना कराव्या यासाठी कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानुसार आपण त्या पिकावर फवारणी करावी .किंवा कृषी विद्यापीठाच्या सांगण्या वरून पुढील निर्णय घ्यावा कृषी तंत्रज्ञानाच्या सल्ल्यानुसार पिकामध्ये लोह म्हणजेच फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमी पणामुळे पूर्णतः पीक पिवळे पडते.

त्याला फ्लोरोसिस असे ही म्हणतात येते.ती एक पिकाची शारीरिक विकृती म्हणावी लागेल कोणतेही पीक पिवळे पडले की पिकाची होणारी वाढ खुंटते .साहजिकच पिकाचे हनारे उत्पन्न हे सरासरी मध्ये कमी होते .त्यासाठी पिकात पाणी साचल्यास पहिल्यांदा ते बांधावरून काढून देण्याचा पर्याय करावा .

थोड पाय शेवळ्यासारखे झाल्यास 0.5% फेरस सल्फेट ची म्हणजेच 50ग्राम प्रति 10लिटर पाण्यात घेऊन पिवळ्या झालेल्या पिकावर फवारण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.तर दुसरे म्हणजे मायक्रो व्युट्रीएंट ग्रेड 2. 50ग्राम लिटर पाण्यात विरघळून कमीतकमी दोन फवारन्या करण्यात त्या.15दिवसाच्या अंतराने असा दोन्ही पैकी एक उपाय शेतकऱ्यांनी आवर्जून करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *