योग्य खतांचा वापर करा आणि खतानवरील खर्च टाळा..!

या खतांचा वापर करा आणि खतांवरील खर्च टाळा नापीक जमीन होईल एकदम सुपीक..!

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो परंतु हा रासायनिक खताचा वापर करताना वापर अगदी बेसुमार पद्धतीने होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम वातावरणावर होतो परंतु जमिनीचे आरोग्य म्हणजे कमी होणे होत देखील आहे तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील रासायनिक खतांचा बेसुमार वापर हा देखील हानिकारक आहे.

त्यामुळे आता बरेच शेतकरी सेंद्रिय खताचा वापर करताना दिसून येत आहेत याकरिता शेणखत व कंपोस्ट खत तसेच गांडूळ खताचा वापर मोठ्या प्रमाणात करतात परंतु या सगळ्या खतांचा विचार केला तर यासाठी आपल्याला खर्च करावाच लागतो आणि त्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ होते या सगळ्या खाताना ऐवजी जर शेतकरी बंधूंनी हिरवळीच्या खतांचा जर वापर केला तर कमीत कमी खर्चामध्ये शेतामध्ये सेंद्रिय खताचा पुरवठा केला जातोच परंतु जमिनीचे आरोग्य देखील खूप चांगल्या पद्धतीने सुधारते म्हणजे रासायनिक खतच नाही तर शेणखत आणि कंपोस्ट खतांना उत्तम पद्धतीचा पर्याय म्हणून हिरवळीचे खत आपण शेती करता वापरू शकतो तसे पाहायला गेले तर शेणखत पिकांच्या भरघोस उत्पन्न करिता आणि जमिनीच्या आरोग्यास खूप चांगली आहे परंतु कुजलेले व चांगल्या दर्जाच्या शेण खताची उपलब्धता कमी दिसून येतेत्यामुळे त्याला पूरक म्हणून हिरवळीचे खत हा एक उत्तम दर्जा आहे .

हिरवळीच्या खताचे कोणकोणते आहेत प्रकार..!

1 – हिरवळीच्या पिकांची लागवड आणि त्यानंतर शेतात काढण्याचे प्रकार

या प्रकारामध्ये टाक आणि दधैचा या प्रकारचे पीक शेतामध्ये वाढवले जातात व त्यानंतर त्यांना शेतामध्ये व्यवस्थित गाडले जातात ही पिके स्वातंत्र्य पद्धतीने देखील लागवड केली जातात किंवा इतर पिकांसोबत अंतर पीक म्हणून देखील याचा आपण अंतर्भाव करू शकतो चवळी, गवार ,ताग धैचा इत्यादी हिरवळ पिकांचा यामध्ये समावेश होतो.

2 – हिरवळीचे खत मम्हणुन हिरव्या पानांचा वापर..!

यामध्ये वनस्पतींची हिरवी पाने किंवा कोवळ्या फांद्या तसेच झुडपे शेतीच्या बांधावरील वनस्पती पडीत जमीन किंवा तसेच जंगलामध्ये वाढलेल्या झाडांची पाने व कोवळ्या फांद्या व कोवळ्या फांद्या गोळा करून जमिनीमध्ये काढ व याकरिता प्रामुख्याने गिरीपुष्प , सुबाभूळ आणि शेवरी यासारख्या वनस्पतींचा समावेश केला जातो.

हिरवळीच्या पिकांची निवड कशी करावी..!

शेतामध्ये जर हिरवळीचा खता करीता हिरवळीचे पीक घ्यायची असेल तर ते कमी कालावधीत उत्तम पद्धतीने वाढणारे व भरपूर उत्पादन देणारे तसेच या पिकाच्या फांद्या या कोवळ्या वर लुसलुशीत असणे गरजेचे असून यामुळे जमिनीमध्ये पाणी व फांद्या कुजण्यावर प्रक्रिया होते.

तसेच हे पीक सुरुवातीच्या कालावधीत म्हणजे वाढीच्या कालावधीमध्ये जलद गतीने वाढणाऱ्या असावी म्हणजेच यामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो की वातावरणातील जो काही नत्र असतो तो नत्र स्थिर होण्यास मदत होते तसेच लागवड केलेल्या पिकाची मुळे जमिनीवर खोलवर जाणारी असली तर जमिनीच्या खालच्या घरातील जी काही अन्नद्रव्य असतात ती पिके शोषून घेतात.

हिरवळीच्या खतांसाठी उपयुक्त पिके..!

1 – उन्हाळ्यात लागवड करण्यासाठी महत्त्वाची पिके..!

उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला हिरवळीचे पिके लागवड करायची असेल तर त्याकरिता जलद वाढणारे धैचा , ताग , शेवरी इत्यादी पिकांची लावगड मी आणि जून या महिन्यात करावी व खरीप हंगामातील पिकाची लागवड जेव्हा केली जाते त्या अगोदर साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट मध्ये ती जमिनीमध्ये गाडावीत.

2 – शेतीमध्ये मुख्य पिकांच्या होळीमध्ये हिरवळी पिक याची लागवड करणे..!
यामध्ये जेव्हा कधी शेतात काही इतर व मुख्य पिकांची लागवड कराल तेव्हा त्या पिकाची दोन ओळींमध्ये हिरवळीची पिके म्हणजे आंतरपीक म्हणून घेणे गरजेचे आहे या प्रकारांमध्ये तुम्ही मुख्य पिकाबरोबर ताग मका कापूस या बागायती पिकांसोबत ताग चवळी किंवा उडीद मूग हरभरा ऊस या मुख्य पिकासोबत धैचा किंवा ताकी हिरवळीची पिके घेतली जातात सात ते आठ आठवड्यांनी ही पिके जमिनीमध्ये काढणे खूप गरजेचे आहे.

3 – मोकळ्या जमिनीमध्ये हिरवळीचे पीक घेणे..!

खरीप हंगामातील ताप तसेच चवळी व इतर भाजीपाला पीक लागवड करून हिरवळीच्या खताचा वापर केला जातो परंतु ही पद्धत काही फायदेशीर नाही कारण यामुळे संपूर्ण एक हंगाम वाया जाण्याची शक्यता असते.

4 – हिरवळीच्या पिकाचा मुख्य समावेश..!

जमीन जर क्षारयुक्त जो पण असेल तर अशी जमीन सुधारण्यासाठी मुख्य पीक म्हणून हिरवळीच्या पिकाचा वापर करणे खूप गरजेचे आहे तसेच वालूकामय मृदा असलेल्या जमिनीत देखील पीक करण्यासाठी हिरवळीचे पिके फायद्याचे ठरतात.

हिरवळीच्या पिकांचे जमिनीला काय फायदे होतात..!

जेव्हा हिरवळीचे पिके जमिनीमध्ये काढले जातात तेव्हा सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होते व जमिनीमध्ये जे काही फायद्याचे सूक्ष्मजीवाणू असतात त्यांची संख्या देखील वाढते व जैविक गुणधर्म सुधारतात दुसरे महत्त्वाचे म्हणजे हिरवळीची पिके जमिनीचा जो काही खोलवर असलेला थोर आहे त्यातून उपयुक्त अन्नद्रव्य शोषून घेतात व कालांतराने जेव्हाही पिके जमिनीमध्ये काढली जातात तेव्हा अन्नद्रव्यांचे उपलब्धता मातीच्या वरच्या थरात वाढण्यास मदत होते तिसरे म्हणजे हे पीक विदलवर्गीय असल्यामुळे हवेतील नत्रज जमिनीत स्थिर करण्यास मदत करतात तसेच जमीन जर हलकी असेल तर उथळ असेल तर अशा जमिनीची जलधारणा वाढण्यासाठी मदत होते तसेच रासायनिक खतातील पाण्याचा मध्यमातून जे काही अन्नद्रव्य वाहून जातात त्याला अटकाव होतो जमीन जर कठीण असेल तर हिरवळीच्या खतांमध्ये जमिनीची घनता सुधारते व घनता कमी होऊन हवा खेळ ते तसेच काळे खोल जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा निस्त्रा व्यवस्थित होतो व जमीन वापस स्थितीत लवकर येते.

हिरवळीच्या पिकांची वाढ जोमदार व जलद असल्यामुळे त्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव होत नाही दही चा यासारखी हिरवळीचे पिके चोपण जमिनीमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे वाढत असल्यामुळे अशी जमीन सुधारण्याकरता जिप्सम सारख्या भुसुधरका स बरोबर हे पीक जमिनीमध्ये काढावे..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *