मेघगर्जनेसह राज्यात सतत मुसळ धार पाऊस

 

           मेघगर्जनेसह राज्यात सतत मुसळ धार पाऊस हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख साहेब यांचा अंदाज ,

                      आपल्या महाराष्ट्र राज्यात मागच्या दोन दिवसापासून अगदी बऱ्या पैकी पाऊसाने हजेरी लावलेली आहे.अगदी विजेच्या कडकडासह ,गर्जनेच्या अवजासह समधार पाऊस चालू आहे,प्रत्येक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.असे आणखी काही व किती दिवस चालू राहील.याचा अंदाज आपले हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख साहेब यांनी वर्तवला आहे.

           प्रसिद्ध हवामान अभ्यासक डख साहेबांच्या अभ्यासानुसार राज्यात पुढील काही दिवस पाऊसाचा जोर हा असाच कायम असल्याचे सांगितले.आंध्र प्रदेश आणि ओरिसा लगतच्या किनार पट्टीवर कमी दाबाच्या पाट्याचे निर्माण झालेले आहे.आणि हा कमी दाबाच्या पट्याची ओढ  ही ओरिसा,मध्यप्रदेश,राजस्थान,महाराष्ट्रात नागपूर या भागापर्यंत याचा परिणाम सध्यातर होत असून हवामानाचा अंदाज लक्षात घेत पूर्णच राज्यात पुढील काही दिवस पाऊसाचा वेग हा असाच राहिल.

     अभ्यासक श्री डख साहेबान कडून सांगण्यात आले आहे विदर्भ,मराठवाडा,कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर या सर्वच भागात अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहे.अंदाजे 18जुलै पासून असा पाऊस सुरू होण्याचे संकेत दिले होते ते खरे ठरले व पाऊसाची  सुरुवात झाली.आणि आता दिनांक 22 ते 25 जुलै पर्यंत पाऊस पडेल काही ठिकाणी मुसळधार पण पाऊस पडू शकतो.

      सरासरी पूर्णच महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो असे अभ्यासकांनी वर्तवले आहे.विशेष म्हणजे कोकण भागात व घाट परिसरात अगदी माथ्यावर पुढील काही तासात अतिवृष्टी होईल .पाऊसाचा जोर हा जोरदार असणार आहे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणे टाळावे काळजी करणे गरजेचे आहे.

            काही भागात दरड कोसळल्या सारखे प्रकार होऊ शकते,पुणे,रत्नागिरी,रायगड, सातारा पालब. या भागात ऑरेंज अलर्ट दर्षविण्यात आला आहे.सिंधुदुर्ग , कोल्हापूर या जिल्ह्यात हवामान खात्याने पाऊसाचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *