मुसळधार पावसाची शक्यता बघा हवामान खत्याचा नवीन अंदाज…?

परत हवामानामध्ये मोठा बदल 1/3 फेब्रुवारी पर्यंत या भागात मुसळधार पावसाची शक्यता बघा हवामान खत्याचा नवीन अंदाज…?

मागील काही महिन्यांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामान बदलामुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकतर गेल्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस झाला.

महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस कांदा यांसारख्या मुख्य पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. यानंतर रब्बी हंगामाला सुरुवात झाली. खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळाले नसल्याने आता रब्बी हंगामातून तरी चांगले उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे पाणी होते त्यांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मात्र रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी झाली आणि नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष बाब म्हणजे या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे कोरडे झाले आहे.

राज्यात आता थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आगामी काही दिवस अशीच थंडी कायम राहणार असा अंदाज आहे. मात्र देशातील काही राज्यांमध्ये 3 फेब्रुवारी पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठं बरसणार अवकाळी पाऊस 

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होईल असा अंदाज आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी दरम्यान हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेशमध्ये आणि 2 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड येथे मुसळधार पावसासह हिमवृष्टी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.एवढेच नाही तर भारतीय हवामान विभागाने पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश तसेच आसपासच्या भागात हलका पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज IMD कडून देण्यात आला आहे.

3 फेब्रुवारी 2024 पर्यंत जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेश येथे मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये उद्यापासून दोन फेब्रुवारीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने यावेळी दिला आहे. यामुळे या संबंधित राज्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढणार असे चित्र तयार होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *