मक्काचे भरघोस उत्पन्रा साठी करा उन्हाळी मक्का लागवड.

 

मका हे पीक खरीप हंगामात आणि उन्हाळी हंगामात उत्पादित केले जाते.

अवघ्या अडीच ते तीन महिन्यांच्या काळात तयार होणारे हे पिक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देते. या पिकाची लागवड दुहेरी उद्देशाने केली जाते.या पिकातून शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा मिळतो तसेच धान्याचे देखील उत्पादन मिळते. दरम्यान या चालू वर्षात मक्याला चांगला भाव मिळतो.याचे कारण म्हणजे पोल्ट्री उद्योगात आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. यामुळे आता मक्याला बाजारात चांगला दरही मिळत आहे.

दरम्यान जर तुम्हीही उन्हाळी हंगामात या पिकाची लागवड करू इच्छित असाल तर तुम्हाला एक जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत याची पेरणी करावी लागणार आहे.कालावधीत पेरणी केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. मात्र उन्हाळी मका लागवड करताना सुधारित जातीचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जातो.

चांगल्या प्रगत वाणाचे बियाणे पेरले तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. अशा परिस्थितीत आता आपण मक्याच्या एका सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत.

मक्याचे हे वाण ठरणार फायदेशीर …

उन्हाळी हंगामात मका पेरणी करण्यासाठी पायोनियर सीड्सचे पी-1899 या वाणाची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे. P-1899 ही पायोनियर सीड्सने तयार केलेली संकरित मक्याची जात आहे.

हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या जातीमध्ये, एका रोपामध्ये दोन कोब्स सहजपणे तयार होतात. विशेष म्हणजे दोन्ही भुट्टे पूर्णपणे दाण्यांनी भरले जातात.

मक्याची ही जात 90 ते 100 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून प्रति एकर 40 ते 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. योग्य नियोजन केले तर उत्पादनाचा हा आकडा 50 क्विंटल पर्यंत पोहोचू शकतो असा दावा केला जात आहे.

या जातीचे बियाणे पेरायचे असल्यास एकरी सात ते आठ किलोग्रॅम बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जातो. जानेवारीत पेरणी केल्यास एप्रिल पर्यंत पीक काढण्यासाठी तयार होऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *