भरघोस उत्पन्ना साठी करा गुलाबी बटाट्याची लागवड…?

करा गुलाबी बटाट्याची लागवड शेतकऱ्यांना होईलअधिक उत्तम फायदा ..!

आता शेतकऱ्यांना सामान्य बटाट्याची लागवड करायची गरज नाही कारण आता देशभरात गुलाबी बटाट्याचीही लागवड होऊ लागली आहे विशेष म्हणजे हा बटाटा दिसायलाही सुंदर दिसतो आणि त्याची चव सामान्य बटाट्यांपेक्षा खूप वेळी आहे हा बटाटा अधिक पौष्टिक आहे असे सर्व तज्ञांचे म्हणणे आहे त्यात कर्बोहायड्रेट्स आणि स्टार्च चांगल्या प्रमाणात आढळून येतात..!

गुलाबी बटाटा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते त्याचप्रमाणे लवकर कुजत नाही हा बटाटा बाजारात खूप लोकप्रिय असून झपाट्याने त्याला मागणी असते या बटाट्याला मागणी वाढल्याने देशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नफा मिळू लागला आहे त्याचप्रमाणे त्याची मागणी जितकी वाढेल तेवढाच शेतकऱ्यांना होणार फायदा..!

गुलाबी बटाट्यातून शेतकऱ्यांना होईल जबरदस्त फायदा..!

तराई आणि डोंगराळ या दोन्ही ठिकाणी या बटाट्याची लागवड करता येते पीक तयार होण्यासाठी 80 ते 100 दिवस लागतात हा बटाटा अतिशय चमकदार असल्यामुळे लोक त्याच्याकडे खूपच आकर्षित होतात..!

काय आहे या बटाट्याची किंमत..!

या बटाट्याची किमती बद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत सामान्य बटाट्या पेक्षा जास्त आहे ते प्रती हेक्टर 400 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते गुलाबी बटाट्याच्या एका पिकातून शेतकऱ्याला एक ते दोन लाख रुपयाचा नफा मिळू शकतो..!

गुलाबी बटाटा आरोग्यासाठी अति उत्तम..!

सामान्य बटाट्याचे तुलनेत हा बटाटा रोगप्रतिकारशक्ती वाढवायचे काम करत असल्याचे असे तज्ञांचे म्हणणे आहे गुलाबी बटाटे अनेक महिने सहज साठवता येते त्याचप्रमाणे विषाणूमुळे होणारे आजारही होत नाहीत यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन नफा जास्त मिळू शकतो..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *