बांबू लागवडी साठी सरकार कडून मिळणार सात लाखा पर्यंत अनुदान

        एक हेक्टर जमीन असेल तर या कामासाठी शेतकऱ्यांना मिळणार सात लाख रुपये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली माहिती…

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसला होता हवामान बदलामुळे अवकाळी अतिवृष्टी ढगाळ वातावरण गारपीट दुष्काळ इत्यादी नैसर्गिक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला या संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याचे विदारक दृश्य गेल्या अनेक वर्षापासून बघायला मिळत आहे मात्र गेल्या वर्षी देखील अशीच परिस्थिती होती.

गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला यामुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनात मोठी घट झाली सोयाबीन कापूस इत्यादी महत्त्वाच्या पिकांमधून शेतकरी बांधवांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता अशा परिस्थितीत हवामान बदलावर उपाय म्हणून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करावे लागणार आहे.

दरम्यान कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जर कमी करायचे असेल तर बांबू लावगड हा एक बेस्ट ऑप्शन ठरणार असल्याचे मत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी व्यक्त केले आहे.नुकत्याच दोन दिवसांपूर्वी शाश्वत शिखर परिषद आयोजित झाली होती आणि याच कार्यक्रमा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलत होते.

त्यावेळी त्यांनी बांबू लागवड हा हवामान बदलावर योग्य पर्याय ठरणार असे मत व्यक्त केले एवढेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात 1000 हेक्टरी क्षेत्रावर याची लागवड होणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बांबू लावगडीमुळे पर्यावरण संवर्धन तर होणारच मात्र शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेच कारण आहे की शासनाच्या माध्यमातून देखील बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी यासाठी शासनाकडून बांबू लावगडीला अनुदान देखील पुरवले जात आहे.

बांबू लागवड ही उस पीक शेतीपेक्षा फायदेशीर असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. बांबू लागवडीसाठी शासनाकडून प्रति हेक्टर सात लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *