बटाटा लागवड करून मिळवा लाखोंचे भरघोस उत्पन्न…!

एका एकरात बटाट्याची लागवड करून मिळवा चार ते पाच लाखापर्यंतचे भरघोस उत्पन्न

शेतकरी मित्रांनो या लेखांमध्ये आपण बटाटा लागवड याविषयी सविस्तर माहिती बघूया. या लेखात आपण एका एकरात बटाट्याचे 45 ते 50 रुपये खर्च करून 4 ते 5 लाख पर्यंत उत्पन्न काढू शकतो उत्पन्नाची वाढ व फवारणी याविषयी सविस्तर माहिती बघूया.

बटाट्याचा वापर खाद्यपदार्थ शिवाय अनेक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे बटाट्याला आपण बघतो की संपूर्ण वर्षभर बाजारामध्ये चांगली मागणी असते. बटाटा लागवड मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये करता येते जमीन कसदार व उत्तम निचरा होणारी असावी थंड हवामान बटाटा पिकासाठी सर्वोत्तम असते.

वेगवेगळ्या पिकांकरिता वेगवेगळे हवामान असणे आवश्यक असते परंतु काही पिकांना गरम तर काही पिकांना थंड हवामान असावे लागते बटाटा या पिकाकरिता थंड हवामान आवश्यक आहे 18 ते 22 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये बटाट्याची वाढ चांगल्या प्रमाणात होते. तर शेतकरी मित्रांनो बटाटा पिकाचे भरघोस उत्पन्न घेणारे कृषी तज्ञ व चांगले शेतकरी असते.

पूर्वमशागत मध्ये 30 ते 35 पण चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत टाकावे, म्हणजे यांनी जमीन चांगली भुसभुशीत होऊन पीक चांगले मिळवता येईल. पिकाला 90 ते 110 किलो नत्र, पलाश हेक्टरी 90 ते 110किलो,स्फुरद 85 किलो टाकने आवश्यक असते. स्फुरद,नत्र व पलाश लव बडी वेळी एकाच वेळेस वापरणे राहिलेले अर्धे नत्र असेल तर लावकडीनंतर 20 ते 25 दिवसानंतर तरी टाकून त्यावर मातीचा भर अवश्य घ्यावा.

पाणी व्यवस्थापन

बटाटा लागवडीनंतर बटाट्याला हलके पाणी द्यावे लागते हे पाणी दिल्यानंतर चार किंवा सात दिवसांनी पाणी द्यावे पाणी देताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की वरून मी दोन तृतीयांश पाण्यामध्ये बुडतील आणि जमीन ही ओलसर राहील अशाप्रकारे पाणी देण्याची दक्षता घ्यावी.20 ते 30 दिवसांनी खुरपणी करून शेती स्वच्छ करून घ्यावी आणि राहिलेली खताची मात्रा ती सुद्धा आपण बटाट्यांना देऊन टाकावी.

दुसऱ्यांदा मातीचा भर अशी आहे ती शक्यतो 50 ते 60 दिवसांनी द्यावी. बटाटा या पिकास 600 ते 700 मिलिमीटर पाण्याची आवश्यकता असते जी जात कमी कालावधीची आहे म्हणजेच 80 दिवसापर्यंत तिला कमी पाणी द्यावे लागते आणि जात 120 दिवसांची आहे त्या बटाट्याला जास्त पाणी द्यावे लागते बटाटा या पिकाला उपलब्धतेचा 60 टक्के ओलावा जमिनीमध्ये जर असेल तर त्यावेळी पाणी दिले तरी चालेल बटाट्याला आपण तुषार सिंचन ने सुद्धा पाणी देऊ शकतो.

बटाट्यातील काही विशेष जाती

कुफ्री अशोका, कूफ्री ज्योती, कुफ्री जवाहर,कुफ्री चंद्रमुखी,कुफ्री लवकर,कुफ्री सिंधुरी अशा काही विशेष जाती आहेत.

बियाणे शक्यतो 2.5 ते 4 सेंटीमीटर आकाराचे असावेत व 25 ते 35 ग्रॅम वजनाचे असावी प्रीती हेक्टरी 25 ते 28 क्विंटल ते आपण वापरले तरी चालतील. बियाण्यांची प्रक्रिया करतेवेळी 1.5करबोंडाझिम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून बिर्याणी बुडवून लावगड करावी तसेच सरी व वरण यामध्ये आपण करू शकतो काय जर ट्रॅक्टरला यंत्र लावून सरी वरण या पद्धतीने बटाट्याची लागवड करतात तर काही शेतकरी बटाट्याची लागवड परंपरागत पद्धतीने करतात आता आपण बघू की एक एकर बटाटा लागवड करायचा आहे आणि चांगले उत्पन्न घ्यायचे आहे तर त्यासाठी किती खर्च येईल औषधी कोणती लागेल आणि त्याकरिता मेहनत किती घ्यावी लागेल.

आपल्याला बटाट्याची एक एकरभर लागवड करायची असेल तर बारा ते तेरा कट्टी आपल्याला बियाण्याची लागतात म्हणजेच सहा क्विंटल पर्यंत आपल्याला बियाणे लागेल जे हजार रुपयांपासून पंधराशे रुपये पर्यंत बाबाची आहेत महाबीज बियाणे तुम्हाला महा बियाण्याची गरज आहे ते दोन हजार रुपये पर्यंत ही मिळू शकते.

त्याचबरोबर आपल्याला बेसन दोस्त सुद्धा लागेल 20:24:23:18:46:10:26:Mop त्यासोबत आपण जे बी खतांचा वापर सुद्धा करू शकतो म्हणजे आपल्याला उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ करता येईल त्यामुळे बटाटा पिकांचा डिस्टन्स पावर सुद्धा वाढेल एकंदरीत खताचा वापर आपण केला तर दहा हजार रुपये पर्यंत आपल्याला खर्च येऊ शकतो आणि जर आपण ट्रॅक्टरने लागवड केली पॅटर्न जर लागवड केली तर आपल्याला ट्रॅक्टरचा खर्च चार ते पाच हजार रुपये लागेल.

बटाटा पिकावर येणारे प्रमुख रोग व त्याचे नियंत्रण कसे करावे

बटाट्यावर येणारे किडे आपण सुरुवातीपासून जर योग्य काळजी घेतली तर बटाट्यावरील पीक किडीचे आपण नियंत्रण करू शकतो त्याकरिता जैविक खत असतील रासायनिक खत तील सेंद्रिय खत असतील त्याचा आपण निश्चितच वापर येथे करावा त्यानंतर आपण स्त्री म्हणजे फवारणी सुद्धा करू शकतो जेणेकरून त्यामुळे कीड नियंत्रणामध्ये सुधार होईल.

करपा असेल तर किंवा किडीवर आपल्याला नियंत्रण मिळवायचे असेल त्यावेळेस आपण जैविक औषधींचा वापर करायला पाहिजे बुरशीनाशके तसेच कीटकनाशक आपण वापरू शकतो आणि ज्यावेळी नियंत्रणांमध्ये येणारी नसेल त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये याकरिता काळजी घेणे खूप आवश्यक आहे त्यासाठी आपण केमिकल जास्त वापरणे ही जरुरी आहे त्यावेळेस आपण कोणतीही उत्पादन काढतो जसे की बटाट्याचे उत्पादन आहे हे काढते वेळेस आपण सेविकांनी सेंद्रिय या दोन्ही खतांचा वापर योग्य वेळी योग्य त्या प्रमाणामध्ये केला पाहिजे.

लागवडीसाठी एकूण येणारा खर्च

बियाणे खते फवारणी त्याचबरोबर ट्रॅक्टरचे अवजारे वापरणे आहे या सर्वांवर खर्च तर येणार परंतु कमीत कमी खर्चामध्ये आपण बटाट्याचे चांगले उत्पादन काढू शकतो तर एकूण खर्च आपल्याला बटाटा उत्पादना करता 45 ते 50 हजार रुपये लागेल हा सर्व एकूण खर्च आहे म्हणजे बटाटा लागवडीपासून तर काढणीपर्यंत हा खर्च येईल.

चांगल्या उत्पादन मिळवण्याकरिता कायकरता येईल.शेतकरी मित्रांनो जर आपल्याला अधिक उत्पन्न पाहिजे असेल पीक चांगलं हवं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता आपण वेळोवेळी फवारणी करणे खूप आवश्यक आहे आणि वेळोवेळी पाणी खत देणे खूप जरुरी आहे.

किती होईल उत्पन्न

आपल्याला वीस रुपये बाजार भाव प्रमाणे जर उत्पादन झालं तर आपल्याला तेथे चार ते साडेचार लाखापर्यंत उत्पादन होऊ शकते म्हणजे तिथे खर्च वजा जाता उत्पन्न आपल्याला तीन ते साडेतीन लाख रुपये मिळेल.

किती दिवसात पीक तयार होते

लागवडीनंतर साधारण तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये आपण बटाट्याचे पीक काढू शकतो तुम्हाला असं वाटत असेल की बाजार भाव चांगले आहे तर बटाटे आपण लवकर सुद्धा विकू शकतो बाजार भाव कमी असतील तर या बटाट्याच्या पाला पूर्णपणे सूकून द्या आणि त्यानंतर त्याची काढणी करा आणि मग बाजारामध्ये विक्रीला न्यान कारण मुरल्यानंतर बटाटा हा परिपक्व होत असतो म्हणजे त्या बटाट्यामध्ये टिकण्याची क्षमता असते.

तर शेतकरी मित्रांनो कमी दिवसांमध्ये जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे म्हणजेच आपण बटाट्याची लागवड करून तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये साधारण दहा हे पीक आपल्याला पैसे देऊन जातो आणि खर्च मात्र 40 ते 50 हजार रुपये लागतो. आपणही बटाट्याचे पीक काढा व एकरी चांगले उत्पन्न येते म्हणजे चार ते साडेचार लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न होऊ शकतो फक्त बटाटा या पिकाला आपण सुरुवातीच्या काळामध्ये दोन महिने जपणे त्याची काळजी घेणे जरुरी आहे.

सेंद्रिय खतांचा वापर जास्त करून आणि गोमुत्राचा वापर करून आपण पीक तजेलदार ठेवू शकतो म्हणजेच पिकावर येणारा अटॅक कमी होऊन जातो रोगराई कमी प्रमाणामध्ये येते आणि भरघोस उत्पन्न देऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *