पावसाचे पुनराआगमन लांबले, आता केव्हा पडणार जोरदार पाऊस ..?

पावसाचे पुनराआगमन लांबले, आता केव्हा पडणार जोरदार पाऊस …? राज्यात काही भागात गेल्या दोन दिवसांपासून टीप-टीप पाऊस सुरू झाला आहे. रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे लवकरच जोरदार पाऊस पडणार अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र मराठवाडा,कोकण,विदर्भ तसेच मुंबई राजधानीमधील काही भागात झालेल्या रिमझिम पावसानंतरही पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत नसल्याची सांगण्यात येत आहे.

कमी दाबाचे क्षेत्र आणि संबंधित चक्रीय वादळाची स्थिती या पार्श्वभूमीवर राज्यात पावसाचा जोर वाढत नाही. विशेष म्हणजे या चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडणारच नाही. पण या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र राज्यात सर्व दूर पाऊस होणार नाही असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामातील पिके वाढण्याच्या स्थितीत आहे सोयाबीन आणि कपाशीचे पीक 50 ते 60 दिवसांचे झाले आहे.या परिस्थितीत पिकांना बऱ्यापैकी पाण्याची आवश्यकता आहे.

जवळपास 17 ते 18 दिवसाचा खंड बघता पिके जळू लागली आहे जमिनीला भेगा पडल्या आहेत. आता जर मुसळधार पाऊस झाला नाही तर पिकांची पावसा अभावी जळून जाण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत.

अगदी जोरदार पाऊस केव्हा पडतो याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे.यातच भारतीय हवामान विभागाने आता जोरदार पावसाला केव्हा सुरुवात होणार याची थेट तारीख सांगितली आहे .पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात जिल्ह्यातील तुरळ ठिकाणी मेघोगर्जनेसह पावसाचा इशारा आहे .परंतु हा पावसाचा शेवटचा इशारा आहे कारण राज्यात काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

विदर्भात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पाऊस होणार आहे मात्र सोमवार ते गुरुवार 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि कोकण या चार दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो खरंतर हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात सरासरी अधिक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

पण या चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे यामुळे ज्याप्रमाणे जून महिन्याची तूट जुलै महिन्यात जास्तीच्या पावसाने भरून निघाली त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याचे तूट सप्टेंबर महिन्यात भरून निघेल असा अंदाज डॉक्टर होसरीकर यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले कि,या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस पडणार आहे.

एकंदरीत आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पाहता सर्वांचे लक्ष आता आगामी महिन्याकडे लागली आहे जर सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस झाला तर खरीप हंगामातील संकटात सापडलेली पिके पुन्हा एकदा उभारी घेतील. आणि शेतकऱ्यांना यावर्षी देखील चांगली कमाई मिळेल…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *