पंतप्रधान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर करावी लागणार शेतकऱ्यांना या अटीची पूर्तता.सर्व शेतकऱ्यांना वार्षिक मानधन देणारी योजना म्हणजे पंतप्रधान किसान योजना.

पंतप्रधान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर करावी लागणार शेतकऱ्यांना या अटीची पूर्तता.शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना वार्षिक मानधन देणारी योजना म्हणजे पंतप्रधान किसान योजना म्हणजेच पीएम किसान योजना.

        ही योजना केंद्राकडून केंद्र शासनाकडून चालवली जाते. आणि लवकरच या योजनेचा 14 क्रमांकाचा मानधनाचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून लवकरच या हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल आणि लवकरच पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरचा 14 व्या हप्त्याची रक्कम जमा केली जाईल.परंतु 14 वा हप्ता हा मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना आपण आपली ई -केवायसी करणे गरजेचे आहे.

               तसेच आपला आधार नंबर मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. भौतिक तपासणी करणे आवश्यक आहे,अशा सर्व प्रकारच्या अटीची पूर्तता करणे हे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे किंवा या अटीचे पालन करणे गरजेचे आहे. ज्या लाभार्थ्यांनी या नियमाचे पालन केले आहे,अशा लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यावर वितरित केला जाईल.अनेक लाभार्थ्यांना अशी शंका आहे की मी या योजनेत पात्र ठरलेलो आहे का नाही माझी केवायसी झालेले आहे का…?

                          ही शंका दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे म्हणजे पीएम किसान पोर्टलवर तुम्ही म्हणजे लाभार्थी पाहू शकता. त्यासाठी प्रथम गुगल वरती जाऊन पीएम किसान योजना असे सर्च करायचे त्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचे पोर्टल दिसेल त्यावरती टच करायचे पूर्ण वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसेल परंतु त्या ठिकाणी ई-केवायसी झालेली नसेल तर लाभार्थी हा ई-केवायसी बटन दाबून आपल्या खात्याची केवायसी करू शकता व त्याचे पूर्ण स्टेटस पाहू शकता.हे जर सर्व आंटीची आपल्या जिम्मेदारीने पूर्तता केलेली असेल तर. पीएम किसान योजनेचा येणारा 14 वा हप्ता हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *