निशिगंधा लावण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा सल्ला..!

निशिगंधा लावण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा सल्ला..!

शेतकरी मित्रांनो निशिगंधा या फुलांना वर्षभर मागणी असते या फुलांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची योग्य निवड,बाजारपेठेनुसार फुलांच्या जातीची निवड खत व पाणी व्यवस्थापन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या किड्यांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.

निशिगंधा लागवडीसाठी भरपूर पाण्याची आणि सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.हलक्या आणि उथळ जमिनीत फुलदांडे व फुले लहान असतात. आणि फुलांचा हंगामही लवकर संपतो. मात्र भारी कळ्या जमिनीत मर आणि कूच रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.चुनखडीयुक्त,लव्हाळीयुक्त व हरळी यासारख्या जमिनीत निशिगंधाची लागवड करू नये.

निशिगंधा लावगडीचे तंत्र

निशिगंधा लावगड मंत्र एप्रिल,मे महिन्यात करावी. मात्र लावगडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावे. कंद मागच्या वर्षीचे पिकापासून निवडावेत. 15 ग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीसाठी वापरल्यामुळे फुले यायला 6 ते 7 महिने लागतात. निवडलेले कंद लागवडी पूर्वी 0.2 टक्का तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात पंधरा मिनिटे बुडवून सावलीत वाळवावे त्यानंतर लावगडीस वापरावे.लागवडीसाठी सरी अथवा सपाट वाके या पद्धतीने लागवड करावी त्यानंतर निवडलेल्या जमिनीची उभी-आडवी खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या घालून जमीन अगदी भुसभुशीत करावी.

हेक्टरी 40 ते 50 टन चांगले मुरलेले क्षणभर मिसळावे सरी किंवा वाफ्यांवर 30 सें.मी. अंतरावर लावगड करून घ्यावी वाफे मात्र 3 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद तयार करावेत.

सपाट वाफ्यात लावगड करत असताना दोन ओळीत 30 सें.मी. व कंदामध्ये 25 सें.मी अंतर ठेवावे.कंद जमिनीत 5 ते 7 सें.मी च्या खोलीवर पुरावे निमुळता भाग वरच्या बाजूस ठेऊन मातानी झकावेत आणि त्यांना त्वरित पाणी द्यावे.हेक्टरी 60 ते 70 हजार कंद पुरेस आहेत.

खत आणि पाणी व्यवस्थापन

निशिगंधा कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला परतिसादही मिळतो.जमिनीची पूर्वमशागत करताना हेक्टरी 40 ते 50 टण चांगले मुरलेले शेणखत मिसळावे.माती परीक्षना नुसार हेक्टरी 200 किलो नत्र 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश द्यावे.संपूर्ण स्फुरद व पलाश आणि 50 किलो नत्राचा हप्ता लावगडीच्या वेळी द्यावे.राहिलेले नत्र 3 समान हप्त्यांत 30,60 आणि 90 दिवसांनी द्यावे. लावगडी नंतर दहा दिवसांनी दहा किलो एझोटोब्याक्टर 100 किलो ओलसर शेणात मिसळावे.या मिश्रणाचा गंज घालून ते मिश्रण आठवडा भर ताडपत्री किंवा प्लास्टिकच्या कापडाने झाकून ठेवावे.

याच 10 किलो स्फुरद विरघळविनारे जिवाणू संवर्धक व 10 किलो ट्रायकोडर्मा पऱ्येकी 100 किलो ओलसर शेणात मिसळून तो गंज आठवडा भर प्लास्टिकच्या कापडाने झाकून ठेवावे.

एक आठवड्यानंतर ते तिन्ही गंज हे खत हेक्टर पिकाला द्यावे लावणी नंतर लगेच पहिले पाणी व दुसरे पाणी 5 ते 7 दिवसा नंतर द्यावे.

पावसाळ्यात पाऊस नसेल तर दहा ते बारा दिवसांनी, हिवाळ्यात आठ दहा दिवसांनी तर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी, जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाणी द्यावे फुलांचे दांडे सुरू झाल्यावर नियमितप्रमाणे पाणी द्यावे. लावगड केल्यापासून पहिले तीन ते चार महिन्यात वेळोवेळी तन काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली,तर पिकाची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते.

निशिगंधा वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या जाती..

सिंगल या प्रकारची फुले पांढरी शुभ्र असून, ही फुले अत्यंत सुवासिक असतात या प्रकारामध्ये सिंगल,शृंगार,प्रज्वल या जाती आहेत ही फुले,हार,गजरा,वेणी व माळा या साठी वापरतात.

डबल प्रकारामध्ये स्थानिक सुवासिनी, वैभव या जाती आहेत या जातींचे फुले फुलदाणीच ठेवण्यात योग्य असतात सेमी डबल एफ प्रकारच्या जातीचे फुले गुच्छा व फुलदाणीत ठेवण्यास योग्य वापरतात .

व्हेरिगेटेड या प्रकारामध्ये सुवर्णरेखा व रजत रेखा या प्रकारच्या जाती आहेत या जाती बागेत किंवा कुंडीत शोभेसाठी लावण्यासाठी वापरली जातात…?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *