तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…?

तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….?

तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. ज्या शेतकऱ्यांनी यंदा तूर लागवड केली असेल आणि त्यांना तुरीच्या पिकातून चांगले उत्पादन मिळाले असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

खरे तर तूर हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जात असते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.

मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी या पिकाची शेती करत असतात. यंदा मात्र कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे तुरीच्या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही.


यामुळे यावर्षी तुरीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, मध्यंतरी तुरीचे भाव 9,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले होते.

काही ठिकाणी याहीपेक्षा कमी भाव मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. अशातच मात्र शासनाने तुर बाजारभावात खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला.

याचा परिणाम म्हणून आता बाजारभावात सुधारणा होऊ लागली आहे. जेव्हा नवीन तुरीची बाजारात आवक झाली तेव्हा बाजारभाव 8500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले होते.

आता मात्र तुरीचे बाजार भाव 10500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 9500 प्रतिक्विंटल ते दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे.

विशेष म्हणजे येथील व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव लवकरच 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील अशी आशा व्यक्त केली आहे. यामुळे तू उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि उत्पादनात आलेली घट भरून निघेल असे बोलले जात आहे.

दुसरीकडे, काही व्यापाऱ्यांनी मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका असल्याने तुरीच्या बाजारभावात फारशी वाढ होणार नाही, परंतु जून-जुलै महिन्यात तुरीचे भाव 14 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील असा अंदाज व्यक्त केला आहे.

जालन्यातील तूर खरेदी करणारे व्यापारी संजय कानडे यांनी न्यूज 18 लोकमत मराठीशी बोलतांना अशी आशा व्यक्त केली आहे. यामुळे तुरीला खरंच एवढा विक्रमी भाव मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे…!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *