तन नियंत्रणासाठी कोणत्या तन नाशकाचा करावा वापर

तन नियंत्रणासाठी कोणत्या तन नाशकाचा करावा वापर.आपल्या महाराष्ट्रात पूर्णतः खरीप हंगामामधील पिकांची पेरणी दिसून येत आहे.आणि अंतर मशागत करणे हे चांगल्या प्रकारे चालू झाले आहे.त्यामध्ये सोयाबीन,तुर,बाजरी,मुग,उडीद,कापूस या पिकांचा समावेश होतो.परंतु काही ठिकाणी बरेच दिवस ओलाइन गेले तरी ही पूर्ण प्रमाणात पाऊस हा पडलेला नाही .

     व पेरणी पण झालेली दिसून येत नाही परंतु हवामान खात्याच्या अंदाजावरून येत्या काळात पूरक असा पाऊस पडण्याचे संकेत दर्शविले आहेत.तर राज्यात बऱ्याच प्रमाणात कापूस हे पीक जास्त प्रमाणात लावले जाते .आणि बऱ्याच प्रमाणात उत्पन्न ही होते यावर्षी पूर्ण राज्यात लावगड करून करून 15 ते 20 दिवस उलटले आहे व अंतर मशागत करण्यात सुरुवात झाली आहे.

आणि आपल्या राज्यात कापसाचे एकरी उत्पन्न हे फारच कमी प्रमाणात होत असल्यामुळे एक मशागतीची वेगळी पद्धत म्हणजे शेतात कापसामध्ये या पिकाची संगोपन करत असताना योग्य वेळ योग्य तन नाशक ,योग्य कीटकनाशकाचा वापर कसा व कोणत्या तणनाशकाचा करायचा आणि जाणकार प्रगतशील शेतकरी असा वापर पण करतात व दुसऱ्यांना पण सल्ला देतात .

तर अश्या वेळेस कापूस पिकात तन नियंत्रणासाठी कोणत्या तन नशकाचा वापर करायचा .योग्य वेळेत फवारणी करायची ती माहिती बघा .जाणकार शेतकरी दिलेल्या सल्ल्यानुसार कापूस पिकांतील अंतर मशागत किंवा पिकांतील तन नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी धानुका  कंपनीचे डाँझो मॅक्स नावाचे तन नाशक वापरू शकता या फवारणी मध्ये , पायरो योरिया ,सोडियम 6%व थिजायफ इयाईन 4%या प्रकारचे घटक आहे.

हे तन नाशक कापूस पिकावर तनासाठी फार महत्वाचे ठरते परंतु कोणत्या वेळेत फवारणी करायची कोणत्या वेळी करायची याची खात्री करून कापूस लावगड पासून किंवा पिकाची उगवण झाल्यापासून साधारणत: 30 ते 35 दिवस झाल्यानंतर किंवा कपाशीच्या झाडाची पाने पाच ते सहा झालेली असावी 15 लिटर पाण्यात 45 ते 50 एम एल टाकावे .

फवारणी साठी पावसाचे साचलेले पाणी घेऊ नये.असे जाणकार शेतकऱ्याच्या अनुभवातून सांगण्यात आले आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *