गहू पिकांचे व्यवस्थापन आणि उत्पादन …?

यावर्षीचा मान्सून आता माघारी फिरत आहे संपूर्ण राज्यातील जवळपास 50% भागांमधून मान्सून ने माघार घेतली आहे येत्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज यामुळे अखिल राज्यात आता उघडदीप पाहायला मिळत आहे आगामी काही दिवसात मात्र आता थंडीची तीव्रता ही वाढेल अशातच मात्र येत्या काही दिवसात रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होईल तरीही मात्र यावर्षी गहू या पिकाची पेरणी जास्त प्रमाणात होईल अशी शक्यता दिसून येत आहे.

खरंतर गहू हे पीक प्रमुख अन्नधान्य पिक असून रब्बी हंगामात या पिकाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात पेरणी होत असते मात्र संपूर्ण भारत वर्षात गहू लावगडी आपल्या राज्यातही या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर यादरम्यान गव्हाची वेळेवर पेरणी केली जाते अशा परिस्थितीत काही दिवसात पेरणीला सुरुवात होणार आहे.

गव्हाच्या काही सुधारित जाती..!

राज 4037: राज्यात या जातीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते या वाणाची पेरणी केल्यानंतर साधारणता 104 दिवसात पीक परिपक्व बनते या जातीपासून हेक्‍टरी 41 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते या जातीचे पीक74 cm पर्यंत वाढते म्हणजेच हा एक मध्यम उंचीचा प्रकार आहे या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा वान तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम आहे या जातीच्या गव्हाचे 1000 दाण्यांचे वजन 44 ग्रॅम भरते.

Macs 6478: महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या जातींमध्ये या जातींचा देखील समावेश होतो या जातीचा पीक परीपक्व कालावधी 110 दिवसांचा आहे या जातींपासून साधारण 45 क्विंटल उत्पादन मिळते विशेष म्हणजे हा वाण काळा आणि तपकिरी तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे.

Uas 428: या जातीची बागायती क्षेत्रासाठी आणि वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारस करण्यात आली हा एक मध्यम कालावधीचा वाण असून साधारणता 108 दिवसात या जातीचे पीक परीपक्व बनते या जातींपासून सरासरी 48 क्विंटल हेक्टरी पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

Akw 4627: हा एक अल्प कालावधी तयार होणारा वान आहे पेरणीनंतर साधारणता 78 ते 100 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते या जातीपासून 36 ते 40 क्विंटल हेक्टरी पर्यंतचे उत्पादन मिळते तांबेरा आणि करपा रोगाचा प्रतिकारक्षम आहे या जातीचे विदर्भ भागासाठी ओलिताखाली आणि उशिरा पेरणीसाठी शिफारस करण्यात येते

तर शेतकरी मित्रांनो ह्या आहे काही गहू या पिकातील काही सुधारित जाती या चार जातींपैकी तुम्ही कुठलीही जात निवडू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *