गव्हाच्या पिकाला किती वेळ द्यावे म्हणजे चांगले उत्पादन मिळेल.

गव्हाच्या पिकाला किती वेळ पाणी द्यावे म्हणजे चांगले उत्पादन मिळेल…..!

कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामातील गहू हे एक प्रमुख पीक आहे. चांगले पाणी मिळाले तर गव्हाच्या पिकातून अधिकचे उत्पादन मिळते.मात्र असे असले तरी अनेकदा जास्तीच्या पावसामुळेही गव्हाच्या पिकाचे नुकसान होते. त्यामुळे गहू पिकात सिंचन करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

कृषी तज्ञ सांगतात की गव्हाच्या पिकातून चांगले जोमदार उत्पादन मिळावे यासाठी पिकाला 40cm पर्यंत पाणी दिले पाहिजे. यापेक्षा कमी किंवा जास्तीचे पाणी पिकासाठी घातक ठरू शकते म्हणून पाणी व्यवस्थापन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

पिकाला केव्हा पाणी दिले पाहिजे……!

सर्वसामान्यपणे गव्हाच्या पिकाला चार ते सहा सिंचनाची गरज असते. मात्र, पिकाला किती सिंचन करावे लागणार हे सर्वस्वी जमिनीवर आणि त्या भागातील हवामानावर अवलंबून राहते. तथापि सरासरी चार ते सहा सिंचनात गव्हाचे पीक तयार होते.

कृषी तज्ञ सांगतात की, वाळू मिश्रित हलक्या जमिनीत गव्हाचे पीक लावलेले असेल तर ६-८ सिंचन आणि भारी चिकणमाती जमिनीत ३-४ सिंचन दिल्यास पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येते.पहिले पाणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी दिले पाहिजे. दुसरे पाणी कळीच्या विकासाच्या वेळी दिले जाते म्हणजे पेरणीनंतर 40-45 दिवसांनी दुसरे पाणी दिले पाहिजे.

तिसरे पाणी पेरणीनंतर 65-70 दिवसांनी, स्टेम नोड्यूलेशनच्या वेळी देण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिले आहे. चौथे पाणी पेरणीनंतर ९०-९५ दिवसांनी म्हणजे फुलोऱ्याच्या वेळी द्यावे, जेणेकरून फुलोरा अवस्थेत असलेल्या पिकाची चांगली वाढ होईल आणि अधिकचे उत्पादन मिळू शकेल.

पाचवे पाणी पेरणीनंतर 105-110 दिवसांनी आणि सहावे पाणी पेरणीनंतर १२०-१२५ दिवसांनी द्यावे, असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *