गव्हाच्या उत्पन्नासाठी करा जिंक सल्फेट चा वापर

गव्हाच्या उत्पन्नासाठी करा जिंक सल्फेट चा वापर कृषी वैज्ञानिकांनी सांगितले कसा करावा वापर…!

गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक जास्तीत जास्त महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यासह संपूर्ण देशभरात लागवड केली जाते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गव्हाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.

आपल्या महाराष्ट्रात देखील गहू लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील प्रमुख बागायती पट्ट्यात या पिकाची लागवड पाहायला मिळते.रम्यान जर तुम्हीही या रब्बी हंगामात गहू लागवड केली असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे.

कारण की, आज आपण गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी झिंक सल्फेटचा वापर केव्हा आणि कसा करावा याविषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी गव्हाच्या पिकात झिंक सल्फेटचा वापर करावा.

कृषी वैज्ञानिकांनी सांगतात की, गव्हाच्या पिकात झिंक या पोषक घटकाची कमतरता असली की उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. त्यामुळे झिंकची कमतरता दूर करण्यासाठी जिंक सल्फेटचा वापर करणे आवश्यक असते.

झिंकच्या कमतरतेमुळे कोणते रोग होतात…!

झिंकची कमतरता असल्यास, गहू पिकाच्या पानांवर बारीक रेषा किंवा राखाडी रंगाचे डाग दिसून येतात. तसेच पिकामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे पिकाची पाने पिवळी पडतात, त्यामुळे पिकाचा हिरवा रंग पिवळा होतो.

शिवाय, झिंकच्या कमतरतेमुळे पाने सुकायला लागतात, त्यामुळे झाडांचे योग्य प्रकाशसंश्लेषण होत नाही, त्यामुळे उत्पादनात घट होते.महत्वाचे म्हणजे झिंकच्या कमतरतेमुळे बियाणे विकासाचा वेग कमी होतो. म्हणजे पिकात दाणे भरले जात नाहीत.

झिंक सल्फेटचा वापर केव्हा आणि कसा करावा..!


कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक एकर जमिनीसाठी 200 लिटर पाण्यात एक किलो झिंक सल्फेट (21 टक्के) आणि अर्धा किलो चुना मिसळून ते मलमलच्या कापडाने गाळून गहू पिकावर फवारावे. असे केल्यास शेतकऱ्याला गव्हाच्या उत्पादनात चांगले परिणाम दिसून येतात. यामुळे गव्हाच्या उत्पादनात वाढ होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *