केंद्राचे पथक कांदा पाहणी साठी महाराष्ट्र दौऱ्यावर…!

केंद्राचे पथक महाराष्ट्रातील कांद्याच्या पाहणीसाठी दौऱ्यावर..?

कमी पर्जन्यमान आणि पाणी टंचाईमुळे यंदाच्या हंगामात कांद्याची लागवड आणि उत्पादन विस्कळीत झालं आहे. खरीप हंगामात सुरुवातीला कांद्याची आवक कमी होती, मात्र त्यानंतर हळूहळू त्यात सुधारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

आता पुन्हा एकदा केंद्राचं पथक उद्या (ता. ६) ते शुक्रवार (ता. ९) या कालावधीत महाराष्ट्रात कांद्याच्या पाहणीसाठी दौऱ्यावर येणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या या पथकातर्फे राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यांचा दौरा केला जाणार आहे.

या दौऱ्यात पथक रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र आणि अपेक्षित उत्पादन, लेट खरीप हंगामातील उत्पादन, प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याची आवक आणि सद्यस्थिती याची पाहणी करणार आहे. तसेच, राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन पुढील नियोजनावर चर्चा करणार आहे.

नाशिक, पुणे आणि बीड या कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यांमध्ये पथकाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. या दौऱ्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर केंद्र सरकार पुढील निर्णय घेणार आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या अपेक्षा..?

केंद्राचं पथक पुन्हा महाराष्ट्रात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की, पथक कांद्याच्या उत्पादनातील घट आणि बाजारपेठेतील परिस्थितीचा योग्य अंदाज घेईल आणि त्यानुसार निर्यातबंदी लवकरच उठवली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *