कापूस साठवून ठेवावा की विकावा शेतकर्या पुढ मोठा प्रश्न …?

कापूस साठवून ठेवावा की विकावा शेतकरी बांधवांनी केले त्यांचे मत व्यक्त…..

यावर्षी पाऊस कमी झाल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे अपेक्षित तेवढे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थितीमुळे सरकारने दुष्काळी सवलती देखील लागू केले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल हे अपेक्षित शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता गेल्या वर्षीच्या तुलनेमुळे यावर्षी कापसाला हमीभाव पेक्षा कमी आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपला माल विकायचा की सुरक्षित ठेवायचा हा विचार करून कापसाचा भाव सुरळीत होईल की नाही याचा विचार करत आहे.

मागील तीन वर्षांपूर्वीचा विचार जर केला तर कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये असा दर होता यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकांपासून कापसाकडे जास्त भर दिला तर मात्र गेल्या वर्षीपासून कापसाचा भाव घसरत जात आहे आणि सध्या 6500ते 7500 असा भाव मिळत आहे गेल्या वर्षीचा विचार जर केला तर उत्पन्न शेतकऱ्यांचे चांगले झाले होते आणि कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला होता डिसेंबर जानेवारी 2021 – 22 मध्ये दर आठ हजार ते आठ हजार दोनशे प्रतिक्विंटल होते परंतु 2022 23 मध्ये या किमतीत घसरण झाली6500 ते 7500 च्या किमतीमध्ये दर आहे

सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनावर या कमी पावसा मुळे विपरीत परिणाम झालेला आहे नंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाच्या उत्पन्नाची गुणवत्ता कमी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा कापूस कमी दराने विकावा लागत आहे सरकारने ठरवून दिलेल्या हमीभाव 7000 तुम्ही चांगल्या दर्जाचा कापूस ही सध्या सुमारे 6500 ते 7000 प्रतिक्विंटल ने दिला जात आहे जास्त खर्चामुळे कापूस लावगड तोट्याचे ठरत असल्याचे दावा शेतकरी बांधव करत आहे.

जर असाच भाव मिळत असेल तर शेतकरी कापूस पिकाकडे दुर्लक्ष देण्याचे संकेत देत आहेत खर्च वाढला असल्याने भावामध्ये घसरण शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे मात्र कापसाचे भाव वाढतील या आशाने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला होता जर दर दीर्घकाळ टिकून राहिल्याने शेतकरी पुढील नुकसान टाळण्यासाठी कमी किमतीमध्ये कापसाचे विक्री करण्यास भाग पडले जाऊ शकते बाजारभावातील स्थिती पाहता शेतकऱ्यांमध्ये अनेक आव्हाने उभे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *