कापूस पिकावरील किड तुडतुडे, मावा, पांढरी माशी यासारखे असंख्य बारीक बारीक जीव नियंत्रण

कापूस पिकावरील किड नियंत्रणशेतकरी बांधवांनो भारत देश हा कृषिप्रधान देश आहे प्रत्येक प्रकारचे पीक आपल्या देशात पिकवले जाते.तर त्यामध्ये कापूस हे पीक आपल्या भारतात प्रामुख्याने चांगल्या प्रकारे पिकवले जातील सध्याच्या वातावरणात कापूस लावगड करून कमी जास्त एक महिना पूर्ण झाला आहे.

आणि निसर्गातील वातावरणामुळे पिकावर वेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.तुडतुडे, मावा, पांढरी माशी यासारखे असंख्य बारीक बारीक जीव हे या झाडावर येऊन ह्या झाडाचा रस शोषण करतात.तर त्यासाठी फवारणी द्वारे त्या पिकाचे किड नियंत्रण करणे गरजेचे आहे.

आता काही आपल्या भारतामध्ये प्रगतशील शेतकरी हे पूर्ण अभ्यास करूनच अधिक प्रमाणात उत्पन्न कसे होईल याच पद्धतीने शेतीची मशागत करत असतात.व बियाणाची निवड करणे, औषधीची निवड करणे आणि त्यासाठी कापसाचे उत्पन्न वाढवण्यासाठी अतिशय नियमितपणे कापूस पिकावर कीड नाशकाचा फवारा मारणे गरजेचे आहेच.

त्यामध्ये ही दुसरी फवारणी करत असताना पिकाची एकूण गुणवत्ता लक्षात घेऊन कीटकनाशक, विद्राव्य खत किंवा पोषक असे टॉनिक अशा प्रकारची औषधी वापरण्याची शिफारस केली जाते.फवारणी वेळी प्रत्येक औषधी चे प्रमाण हे योग्य प्रमाणातच वापरावी औषधी ही कंपनीचेच वापरावे प्रमाणाबाहेर औषधीचा वापर करू नये.

विशेष म्हणजे औषधी फवारताना जो आपण पाण्याचा वापर करतो ते साचलेले पाणी किंवा जास्त काळ साठलेले पाणी नसावे.कारण वळणाजवळ साचलेले पाणी वापरल्यास आपण वापरलेले औषधीचा पावर पूर्णत: कमी करतो. आणि त्यात थोड्या प्रमाणात त्यामध्ये स्टिकर चा वापर करणे आवश्यक आहे.

हे सर्व करत असताना प्रगतशील शेतकरी किंवा कृषी सेवा केंद्राचे संचालक (दुकानदार) यांच्या सल्ल्याने औषधी निवडावी त्यांच्या सल्लयानुसार औषधाचे प्रमाण वापरावे.अश्या प्रकारे मशागत केल्याने अधिक उत्पप्न मिळू शकते….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *