डाळिंबाबरोबर कांद्याच्या बाजार भावात झाली वाढ..!

 

 

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी डाळिंबाबरोबर कांद्याच्या बाजार भावात ही झाली आहे भरपूर प्रमाणात वाढ..!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे डाळिंबा पाठोपाठ आता कांद्याच्या बाजारभाव तही विक्रमी वाढ होत आहे वास्तविक गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाच्या बाजारभावात मोठी वाढ होताना दिसून येत आहे डाळिंबाला कधीही मिळालेला नव्हता एवढा ऐतिहासिक दर मिळत आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राहता कृषी बाजार समितीमध्ये डाळिंबाला आठशे रुपये प्रति किलो भाव मिळाला होता अशातच कांद्याच्या दारातही सुधारणा होत आहे त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण दिसायला मिळत आहे.

खरंतर राज्यात डाळिंब आणि कांदा या दोन्ही पिकाचे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते या व्यतिरिक्त राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये या या दोन्हीही पिकाची मोठ्या प्रमाणात शेती घेतली जाते सहाजिकच या पिकांवर शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण अवलंबून असते मात्र राज्यातील डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय असं पाहायला मिळत आहे.

खरंतर कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही काळ मंदीत गेलेल्या कांद्याच्या बाजार भावात आता पुन्हा एकदा रुळावर आला आहे कांद्याला आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८०० रुपये प्रतिक्विंटल ते 3400 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान सरासरी भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे आज राज्यातील एक महत्त्वाच्या एपीएमसी मध्ये कांद्याला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज चंद्रपूर गंजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 320 क्विंटल कांद्याची आवक झाली होती या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2500 रुपये प्रतिक्विंटल कमाल पाच हजार रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 34 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *