कांद्याला मिळतोय सध्या बाजारात चांगला भाव…?

 

   

                          सहा महिने रडवणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांना हसवले,कांदा हे एक प्रमुख नगदी पीक आहे मात्र या नगदी पिकाने शेतकऱ्यांना यंदा चांगलच रडवलं आहे जानेवारी महिन्याच्या अखेर पासून ते जून महिन्यापर्यंत कांद्याचा बाजारभाव खूपच मंदीत होता.बाजारातील ही मंदी शेतकऱ्यांसाठी खूपच घातक ठरली यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

विशेषता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला खूपच कमी दर मिळत होता त्यावेळी कांदा मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो अर्थातच 200, ते 300, रुपये प्रति क्विंटल दरम्यान: विकला जात होता यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही.मात्र आता गेल्या जुलै महिन्यापासून बाजारातील मंदी दूर झाली आहे बाजारात आता कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळत आहे.

कांद्याला जवळपास 1000, हजार रुपये प्रति क्विंटल ते 1800, रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळू लागला आहे काही बाजारात 3000, प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर नमूद केला जात आहे.मात्र 2000, हजार रुपयाचा सरासरी भाव राज्यातील खूपच मोजक्या बाजार समितीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

 आज राज्यातील अनेक बाजारात कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे यामुळे कांदा बाजार पुन्हा मंदीत जाणार की काय…? असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.कांदा बाजारातील लहरीपणा पाहता याबाबत आत्ता स्पष्टपणे सांगता येणार नाही आज राज्यातील प्रमुख बाजारात याबाबत आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सध्या कांद्याचा बाजार तेजीला आला आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानी वातावरण पाहायला मिळत आहे आज देखील राज्यात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.काही बाजारात 400, ते 500, रुपये असा भाव मिळत होता मात्र खूपच मोजक्या मालाला हा दर मिळायचा शिवाय 4 ते 5 रुपये प्रति किलोचा भाव पिकासाठी आलेला उत्पादन खर्च तर सोडाचं पण वाहतुकीचा खर्च काढण्यासाठी देखील पुरेसा नव्हता.

सहाजिकच यामुळे शेतकऱ्यांचे अर्थीकरण कोलमडले होते यामुळे कांद्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले आहे.मात्र आता गेल्या महिन्यापासून म्हणजे जुलै महिन्यापासून कांदा दरात तेजी आलेली आहे याचा परिणाम म्हणून सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.

दरम्यान: आज राज्यात कांद्याला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कामाला बाजार भाव मिळाला आहे.पण तरीही गेली पाच ते सहा महिने कवडीमोल दरात कांदा विकला असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई यातून होणे अशक्य असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.मात्र असे असले तरी दारात झालेली हे सुधारणा शेतकऱ्यांना हातभार लावणार असं शेतकऱ्यांकडून एकल जात आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *