कांदा उत्पादक शेतकर्‍यांना भाव वाढीचा मोठा दिलासा,

 

 

मागणी वाढल्याने उन्हाळी कांद्याच्या दराचा आधारनमस्कार शेतकरी मित्रांनो बरेच दिवसानंतर कांद्याच्या बाजारभावात खूप चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे बाहेर राज्यामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात मागणी चालू असल्या कारणांमुळे कांद्याच्या दारात अगदी चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे.चला तर जाणून घेऊया आजचे राज्यातील ठराविक ठिकाणचे कांदा बाजार भाव..

यावर्षी रब्बी उन्हाळी कांदा हंगामामध्ये वातावरणीय बदलामुळे काढणी दरम्यान व साठवणूक पश्चात मोठ्या प्रमाणात सड झाली आहे.मागणी वाढल्यामुळे शेवटी चार महिन्यानंतर शेतकऱ्यांना दराचा आधार मिळाला आहे मात्र उत्पादन खर्च व मिळणाऱ्या दराची जुळवा-जुळव करण्यात शेतकऱ्यांना अडचण येत आहे.

सध्या मागणीत वाढ व आवक दबावात असल्यामुळे कांदा पुरवठ्यावर काहीसा तान आहे त्यामुळे जिल्ह्यातून प्रमुख कांदा बाजारात उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार रुपये दर मिळत आहे.या महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत दुसऱ्या सप्ताहात क्विंटल मागे 500 ते 700 रुपये दराने सुधारणा झाली आहे.

उत्पादन खर्च व उत्पादन या दोन्ही अंगाने उन्हाळी कांदा पिक शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरले आहे नवीन उन्हाळी कांदा काढणीनंतर गेले साडेचार महिने उत्पादन खर्चाचा खाली दर मिळाला.त्यातच तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील दरांच्या तुलनात्मक चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ झाला.

राज्यातील अनेक शेतकरी तेलंगणात कांदा कांदा विक्रीसाठी गेली असता खर्चाच्या बाजूला भरडले गेले मागील काळात देशांतर्गत व आखात देशात मागणी काढून त्यात टप्प्याटप्प्याने कांदा दरात सुधारणा होत आहे.नाशिक विभागात गुणवत्तेचा कांदा उपलब्ध होत असल्याने या भागात मागणी वाढली आहे यामुळे कांदा दारात सुधारणा झाली आहे आणि ती पुढे कायम राहील.

सध्या बांगलादेशमध्ये मागणी वाढली आहे त्यामुळे कांदा दरात सुधारणा झाली आहे शिवाय नगर,सोलापूर या भागात कांद्याची आवक तुलनेत कमी आहे.त्यातच तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील दराच्या तुलनात्मक चर्चांमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ झाला यापूर्वी जूनअखेर जिल्ह्यातील प्रमुख बाजारात आवक काढूनही दर 300 ते 400 रुपयांनी वाढले.

शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात विकल्याने काहीच दिलासा मिळाला होता मात्र खर्च व उत्पन्नाचे गणित अनेकांचे जुळलेले नाही.गेले चार महिने उन्हाळी कांदाला भाव नव्हते त्यात साठवलेल्या मालाचे नुकसान अधिक आहे.आता वाढलेले दर उपलब्ध कांद्याचे गणित केल्यास फक्त उत्पादन वसूल होईल.

त्यामुळे देशभरात कांद्याला मागणी वाढली असून निर्यात सुधारणा आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *