कसा राहील या महिन्यातील हवामान अंदाज

कसा राहील या महिन्यातील हवामान अंदाज म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातील हवामान अंदाज..!

यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र मध्ये पावसाने निराशा केली आहे मुळातच पावसाची सुरुवात यावर्षी निराशे जनक ठरली आहे त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या होत्या मात्र त्यानंतर पावसाने जुलैमध्ये सर्व दूर हजेरी लावली होती व खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना वेग आला व पेरण्या पूर्ण देखील झाल्या मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने खूप दिवसाचा खंड दिला खरीप हंगामातील सर्व पिके वायाला जाण्याची भीती सर्व शेतकरी बांधवांना लागलेली होती.

परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने परत राज्यातील बऱ्याच भागात चांगल्यापैकी हजरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले त्या दृष्टीने बघायला गेले तर यावर्षी पावसाने सरासरी देखील गाठलेली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाचे उंबरठ्यावर उभा असताना मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना दिलासा, आधार मिळाला आहे.

विशेष म्हणजे राज्यातील बरेच धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे तूर्तास बरेच जिल्ह्यांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे आज एक ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र भरात पाऊस कसा राहील हा देखील मोठा प्रश्नच आहे.

त्यातच मान्सून ने परतीचा प्रवास सुरू केला असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मनामध्ये परतीचा पाऊस कसा राहील हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या अनुषंगाने जर आपण शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव असलेले मात्र प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख साहेब यांनी ऑक्टोबर महिन्यातील हवामान अंदाज वर्तवलेला आहे मात्र त्याबाबतची महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

श्री पंजाबराव डख साहेब यांचा ऑक्टोबर महिन्यातील हवामान अंदाज..!

या बाबाचे सविस्तर वृत असे आहे की प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख साहेब यांनी ऑक्टोबर महिन्यातील हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की राज्यामध्ये मोकळे वातावरण राहणार आहे, मात्र पावसाचा जोर हा कमी असणार आहे मात्र काही भागांमध्ये पाच सहा आणि सात ऑक्टोबरला पावसाची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *