कसा मिळणार एका रुपयात पिक विमा बघा,

कसा मिळणार एक रुपयात विमा

                  शेतकऱ्यांच्या असलेल्या पिकाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर पिकाची परिस्थिती चांगली नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यास फारच कठीण जात आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील अल्पभूधारक व बहुभुधारक शेतकऱ्यांसाठी पिक विमा हि योजना राबविली आहे.

              या योजनेमध्ये शेतकऱ्यांची पिकाची एवढी रक्कम आहे तेवढी रक्कम हे राज्य सरकार भरणार आहे ही योजना पूर्ण एकूण तीन वर्षासाठी चालू केलेली आहे 2023 ते 2026 पर्यंत यामध्ये खरीप हंगामात किंवा रब्बी हंगाम असेल या दोन्ही हंगामासाठी राबविण्यात आलेली आहे.

         तर शेतकरी आपल्या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करून फक्त एक रुपया भरणा करावा राहिलेली विम्याचा भरणा  हे राज्य सरकार करणार असल्याचे शासनाने मार्फत सांगण्यात आले आहे.तर शेतकरी मित्रांनो ह्या विम्याचा लाभ कसा  मिळणार हे व्यवस्थित बघून घेऊ.

1) शेतात बियाणाची लागवड किंवा पेरणी झाल्यापासून ते पीक काढणीपर्यंत पावसाचा खंड पडल्यास दुष्काळ पडल्यास, चक्रीवादळ झाल्यास, गारपीट झाल्यास, नैसर्गिक आग लागल्यास ,किंवा जास्तीचा पाऊस म्हणजे जलमय झाल्यास, किंवा पीक काढण्या अगोदर नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसान यामुळे विमा मिळू शकतो.

2) पावसाच्या अभावामुळे पेरणी किंवा लागवड न झाल्यामुळे विमा मिळू शकतो.

3) खरीप किंवा रब्बी हंगामात हवामानातील बदलामुळे पिकाची झालेले नुकसान यासाठी हा विमा मिळू शकतो, अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे ड्रोन द्वारे स्मार्टफोन प्लॅटफॉर्म पंचनामे होतील .तेच  नुकसान ग्राह्य धरून तातडीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्याची रक्कम ही जमा केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *