कसं असणार पुढील दोन दिवसाचं महाराष्ट्रातील हवामान.

कसं …? असणार पुढील दोन दिवसाचं महाराष्ट्रातील हवामान.

राज्यसह देशातील हवामानात सातत्याने मोठा बदल होत आहे उत्तर राज्याकडील भागांमध्ये थंडीचा जोर दिसून येत आहे तर दक्षिण राज्यामध्ये अजूनही मुसळधार पावसाचा तडाखा सुरू आहे.

             अर्थातच देशात विरोधीय वातावरण तयार झालेले आहे आपल्या राज्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती काही दिवस सुरू होती मात्र राज्यात नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने सुरू झाली यामुळे शेतकरी मित्रांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती अरबी समुद्रात कमी झालेला दाबाचा पट्टा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत होता मात्र आता या समुद्रातील ही प्रणाली निवारली आहे.

              यामुळे राज्यात अवकाळी पावसाचे सत्र संपूर्ण राज्यात थांबलेले असून दरम्यान पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातील हवामाना संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.आगामी महाराष्ट्रातील हवामान दोन दिवस कसे राहणार सध्या मात्र राज्यावर कोणतीच हवामान प्रणाली सक्रिय नाहीये म्हणजेच महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होणार नाही नविन  वर्षाच्या सुरुवातीपासून दाखल झालेला अवकाळी पाऊस आता विश्रांती घेणार आहे.

                      अवकाळी पावसाचे सत्र पूर्णपणे थांबलेले असून उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आता आकाश निरभ्र राहील तसेच हवामान कोरडे राहील तर काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता दिसून येत आहे.पुढील दोन ते तीन दिवस अर्थातच 16 जानेवारी पर्यंत किमान तापमान जवळपास चार ते पाच अंश सेल्सिअस ची घट होईल असा अंदाज आहे तर मात्र दुसरीकडे कमाल तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे.

                पुणे शहर आणि परिसरात देखील अशीच परिस्थिती राहणार आहे पुण्यात देखील हवामान कोरडे राहील आकाश निरभ्र राहील आणि थंडीचा जोर वाढणार अशी पुणे येथील वेधशाळेने माहिती दिली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *