कशी घेताय दुधाळ जनावरांची काळजी…?

अशी घ्या दुधाळ जनावरांची काळजी…?

जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आज एक महत्त्वाची माहिती आहे. आज आपण दुधाळ जनावरांना कसा आहार दिला पाहिजे याविषयी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेनार आहोत.

खर तर जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर विशेष काळजी घ्यावी लागते. जनावरांच्या आहारावर 70 टक्के एवढा खर्च होतो. जनावरांच्या आहारासाठी व्यवस्थित काळजी घेतली तर दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन वाढते.

पशुचिकित्सकांनी सांगितल्याप्रमाणे, दुधाळ जनावरांना संतुलित आहार दिला गेला पाहिजे. जनावरांना चांगल्या प्रतीची प्रथिने, इतर पोषक द्रव्य आवश्यक असतात.

यासाठी जनावरांना चांगला हिरवा चारा दिला गेला पाहिजे. जनावरांना चांगला द्विदल चारा मिळाला पाहिजे. लुसर्ण, बरसीम, मूग, भुईमूग उडीद यासोबतच मका, ज्वारी इत्यादी चारा यांचे प्रमाण असले पाहिजे.

जनावरांना चांगल्या दर्जाचे खनिज देखील दिले गेले पाहिजे. जर जनावरांना खनिज मिळाले नाही तर दूध उत्पादनावर परिणाम होतो. त्यांना वेगवेगळे आजार होतात.

वंधत्व येऊ शकते. जनावर माजावर येत नाही. दरम्यान पशुखाद्यात किंवा चाऱ्यात एकदम बदल करू नये असा देखील सल्ला देण्यात आला आहे.

जर एकदम पशुखाद्यात किंवा चाऱ्यात बदल केला गेला तर जनावरे अपेक्षित प्रमाणात चारा खात नाहीत. जर जनावरांनी कमी चारा खाल्ला तर अपचनाचा त्रास होऊ शकतो. जनावरे कोरडा चारा खात नाहीत.

यामुळे कोरडा चारा न देता पाण्यात भिजवून नंतर जनावरांना खायला दिला पाहिजे. तसेच जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी. निकृष्ट चाऱ्यावर तज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य प्रक्रिया करावी. जनावरांसाठी योग्य जंतनाशकांचा वापर करावा.

याशिवाय जनावरांच्या गाभण अवस्थेत त्यांना चांगला संतुलित आहार दिला गेला पाहिजे. यामुळे पोटात वाढणारे वासरू सुदृढ होते.

गर्भात वासराची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना चांगला आहार देणे आवश्यक असते. अशा तऱ्हेने जर आहार व्यवस्थापन योग्य असेल तर पशुपालनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येणे शक्य होणार आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *