कलिंगड लागवड आणि व्यवस्थापन.

हंगामी पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. कलिंगड या वेलवर्गीय पिकाचा देखील हंगामी पिकांमध्ये समावेश होतो.

कलिंगड लागवड केव्हा केली पाहिजे…!

शेतकरी मित्रांनो जर तुमचा आता कलिंगड लागवडीचा विचार असेल तर तुम्ही 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत कलिंगड लागवड करू शकता.कलिंगड लागवड करण्यासाठी मात्र सुधारित पद्धतींचा वापर करावा. लागवडीसाठी आळे पद्धत, सरी-वरंबा पद्धत, रुंद गादी वाफा पद्धत आणि मल्चिंग पेपरचा वापर करावा.

कोणत्या जमिनीवर लागवड केली पाहिजे…..?

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कलिंगड लागवड चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमिनीत कलिंगड लागवड करू नये. अशा जमिनीत कलिंगड पीक चांगले वाढत नाही. या जमिनीतील विद्राव्य क्षारांमुळे फळांवर डाग पडण्याची शक्यता सुद्धा असते.यामुळे या पिकाची लागवड मध्यम-काळ्या ते कोरड्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोणत्या जातीची लागवड करावी ?

कृषी तज्ञांनी कलिंगडच्या सुधारित जातीची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. शुगर बेबी, मधू, अर्का माणिक, मिलन, अमृत, अर्काज्योती, अर्का राजहंस, अर्का जीत इत्यादी कलिंगडच्या सुधारित वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळू शकणार

अशा पद्धतीने करा लावगड अतिशय चांगल्या प्रमाणात होईल उत्पादन….?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *