करा वृक्ष लागवड मिळते एकरी अडीच लाखाचे अनुदान…

करा या वृक्षाची लागवड मिळणार एकरी अडीच लाखाचे अनुदान…

मिळालेल्या माहितीनुसार या वृक्ष लागवड अनुदान योजनेअंतर्गत महोगणी, चंदन, चिंच, जांभूळ अशा 31 प्रकारच्या वृक्ष लागवडीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकरी दोन लाख 56 हजाराचे अनुदान मिळते.

यामुळे शेतकरी बांधवांना कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊन वृक्ष लागवडीचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान आज आपण महोगनी लागवडी संदर्भात माहिती पाहणार आहोत. महोगनीची झाडे खूपच मौल्यमान समजली जातात.

या झाडाच्या प्रत्येक भागाचे एक वेगळे महत्त्व आहे. या झाडाची पाने, बिया, साल, लाकूड इत्यादीना बाजारात मोठी मागणी असते. यामुळे महोगणी झाडाची लागवड केली तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळू शकते. कृषी तज्ञ सांगतात की हे झाड दोनशे फुटांपर्यंत वाढते.

मात्र आपल्या भारतात हे झाड फक्त 60 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. या झाडाच्या लाकडाचा वापर जहाज, फर्निचर, सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या झाडाच्या लाकडावर पाण्याचा कोणताच विपरीत परिणाम होत नाही.

यामुळे फर्निचर इंडस्ट्रीमध्ये या लाकडाचा वापर वाढत आहे. विशेष म्हणजे या लाकडाला बाजारात चांगला भावही मिळतो. या झाडाच्या बियांचा आणि फुलांचा उपयोग औषधे बनवण्यासाठी होतो. रक्तदाब, दमा, सर्दी आणि मधुमेह सारख्या आजारांवर यां झाडाच्या पानांचा वापर केला जात आहे.

विशेष म्हणजे या झाडांवर कोणत्याच रोगराईचा प्रादुर्भाव पाहायला मिळत नाही. एका एकरात 1500 महोगणीचे झाडे लावता येतात. विशेष म्हणजे लागवड केल्यानंतर सरासरी 12 ते 15 वर्षांनी याचे झाड उत्पादनासाठी तयार होते.

या झाडाची लागवड डोंगराळ भागात आणि जास्तीच्या पावसाच्या ठिकाणी केली जात नाही.इतर कोणत्याही ठिकाणी आणि जमिनीत या झाडाची लागवड केली जाऊ शकते. एकंदरीत एकरी अडीच लाखांचे अनुदान घेऊन महोगनी लागवड केली तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळू शकणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *