आज पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार…?

आज पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार…?

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजा नुसार सांगितले आहे की आज पासून अर्थातच 11 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भात मुसळधार गारांचा पाऊस पडणार आहे.

अमरावती,अकोला,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,पुसद,यवतमाळ, वाशिम,हिंगोली या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच बुलढाणा शेगांव खामगांव चिखली भागात ढगाळ वातावरण रहाणारं आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामन अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

नांदेड,परभणी,रिसोड,मेहकर या हि ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होणार असे बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *